Join us
Daily Top 2Weekly Top 5

काकडी आणि गाजर घालून करा चविष्ट गारेगार दहीभात, पचनासाठी हलकी आणि प्रत्येक घासात सुख !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 13:16 IST

Make delicious curd rice with cucumber and carrots, light for digestion and a pleasure in every bite : दही भात करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा.

उष्णता असो वा पित्त असे त्रास झाले की पचन नीट होत नाही. तसेच काहीही खावेसे वाटत नाही. त्यामुळे भूक तर लागते मात्र खाल्ले की घशाशी अडकतं असं काहीसं व्हायला लागतं. अशावेळी करण्यासाठी एकदम मस्त रेसिपी म्हणजे दहीभात. (Make delicious thick curd rice with cucumber and carrots, light for digestion and a pleasure in every bite!!)मात्र हा साधा चविष्ट दहीभातही विविध प्रकारे करता येतो. कधी काकडी गाजर घालून दही भात केला का? पाहा जरा हटके आणि चविष्ट रेसिपी. 

साहित्य दही, भात, काजू, मोहरी, तेल, कडीपत्ता, हळद, मीठ, शेंगदाणे, डाळिंब, हिरवी मिरची, उडदाची डाळ, जिरं, कसुरी मेथी, चणाडाळ , काकडी , गाजर , तूप , कोथिंबीर 

कृती१. एका पॅनमध्ये थोडे तूप घ्यायचे आणि त्यावर काजू परतून घ्यायचे. भात शिजवायचा. व्यवस्थित गार होऊ द्यायचा. पसरवायचा आणि त्यातील वाफ जाऊ द्यायची. काकडी सोलायची आणि चिरायची. मस्त बारीक चिरायची. तसेच गाजरही सोलायचे आणि किसून घ्यायचे. गाजर मस्त बारीक किसा. उडदाची डाळ भिजत ठेवायची. 

२. तुपावर शेंगदाणेही परतून घ्यायचे. एका खोलगट भांड्यात गार झालेला भात, मस्त ताजं दही, अगदी थोडं पाणी घ्यायचं. पाणी नाही घातलं तरी चालेल. परतलेले काजूही घालायचे.  त्यात काकडीचे तुकडे घालायचे. नंतर किसलेले गाजरही घालायचे. डाळिंबाचे दाणे घाला. सगळं मस्त मिक्स करा. 

३. फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे.  त्यात मोहरी घालायची आणि मस्त तडतडू द्यायची. फोडणी तडतडल्यावर त्यात भिजवलेली उडदाची डाळ घालायची. डाळीचा रंग बदलायला लागल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालायचे. जिरं घालायचं आणि चणाडाळ घालायची. फोडणी मस्त खमंग परतून झाल्यावर गॅस बंद करा आणि मग त्यात कसुरी मेथी घाला. छान बारीक चिरलेली कोथिंबीर दही भातात घालायची. फोडणी भातात ओतायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. भात एकजीव कालवायचा. 

टॅग्स :पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नसमर स्पेशल