Join us

श्रावणात करा रताळ्याचे चविष्ट काप, उपासाला चालणारी ही रेसिपी एकदा केली तर पुन्हा नक्की कराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2025 18:14 IST

Make delicious sweet potato recipe during Shravan. If you make this recipe once, you will definitely make it again : मस्त चविष्ट उपासाचे पदार्थ श्रावणात तर करायलाच हवेत. पाहा कसे करायचे रताळ्याचे काप.

उपासाला काही चटपटीत आणि कुरकुरीत खायला मिळालं तर मज्जाच येते. साबुदाणा वडा तर घरोघरी केलाच जातो. पण असेही काही पदार्थ असतात जे फार केले जात नाहीत. जसे की हे रताळ्याचे काप. (Make delicious sweet potato slices during Shravan. If you make this recipe once, you will definitely make it again.)अर्थात रताळ्याचे काप हा तसा लोकप्रिय पदार्थ आहे. मात्र उपासाला नाही तर असाच खाल्ला जातो. त्यात भरपूर आलं-लसूण आणि मैदा, विविध पिठं असतात. मात्र उपासालाही हे काप करता येतात आणि चवीला एकदम मस्त लागतात. त्यासाठी साबुदाणा वापरावा लागतो. एकदा पाहा उपासाचे काप कसे करायचे. 

साहित्य रताळं, साबुदाणा, हिरवी मिरची, मीठ, तूप 

कृती१. रताळं एकदम स्वच्छ धुवायचे. धुऊन झाल्यावर सोलून घ्यायचे. एका पातेल्यात पाणी गरम करायचे. रताळ्याचे दोन भाग करायचे आणि गरम पाण्यात शिजवायचे. पाण्यात थोडे मीठ घालायचे.  पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवायचे नाही. मध्यम शिजवायचे. मग पाण्यातून काढायचे आणि जरा गार होऊ द्यायचे.

२. जरा गार झाल्यावर त्याचे गोलाकार काप करायचे. जास्त जाड नको आणि अति पातळही नको. मध्यम आकाराचे  काप करायचे. एका पॅनमध्ये साबुदाणा परतायचा. अगदी थोडा वेळ परतायचा. परतून झाल्यावर कुरकुरीत होतो. मग गार करायचा. एका मिक्सरच्या भांड्यात घ्या. मिक्सरमधून मस्त वाटून घ्यायचा. साबुदाण्याचे पीठ तयार करायचे. मस्त सरसरीत पीठ होते. त्यात थोडे मीठ घालायचे.

३. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि मग मिरची वाटायची. मस्त पेस्ट तयार करायची. साबुदाण्याचे पीठ एका पसरट ताटात घ्यायचे. त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट ओतायची. जरा मिक्स करायची. नंतर रताळ्याचे काप त्या पिठात मस्त घोळवायचे. सगळीकडे छान पीठ लागेल याची काळजी घ्यायची. 

४. पॅनमध्ये किंवा तव्याला तूप लावायचे. सगळीकडे पसरवायचे. एक एक करुन रताळ्याचे काप ठेवायचे. मस्त कुरकुरीत परतायचे. दोन्ही बाजूंनी लालसर सोनेरी होतील. मग काढून घ्यायचे. चवीला एकदम मस्त लागतात. दह्याशी खा तसेच जर तुम्ही उपासाला कोथिंबीर खाता तर नक्की वापरा. तसेच लाल तिखट खात असाल तर ते ही घालू शकता. लिंबू ही पिळू शकता.   

टॅग्स :श्रावण स्पेशल पदार्थश्रावण स्पेशलअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.