Join us
Daily Top 2Weekly Top 5

गरमागरम रगडा आणि गारेगार चटण्या घालून करा मस्त रगडा चाट - पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 17:14 IST

Make delicious Ragda Chaat - nutritious and tasty recipe, must try snack recipe : चवीला जाम भारी रगडा चाट करा झटपट.

रगडा चाट हा मुंबईच्या स्ट्रीट फूडमधला एक खास आणि खूप लोकप्रिय प्रकार आहे. उकडलेल्या पांढऱ्या वाटाण्याचा गरमागरम रगडा, त्यावर टाकलेले बटाटे, चटण्या, कांदा, शेव आणि मसाल्यांची पखरण यामुळे या पदार्थाला एक वेगळीच चव येते. तिखट, गोड आणि आंबट अशा तिन्ही चवींचा सुंदर मेळ यात मिळतो. (Make delicious Ragda Chaat - nutritious and tasty recipe, must try snack recipe) संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा पाहुणचारासाठी हा पदार्थ अगदी योग्य ठरतो.

साहित्य पांढरे वाटाणे, बटाटे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, शेव, कोथिंबीर, लिंबू, तेल, पाणी

कृती१. पांढरे वाटाणे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवा, सकाळी हे वाटाणे कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. वाटाणे चांगले मऊ झाले की रगड्याची चव अधिक छान लागते, त्यामुळे ते नीट शिजले आहेत याची खात्री करा.

२. यानंतर कढईत थोडे तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद आचेवर परता. कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घाला. हे मिश्रण छान परतून घ्या, म्हणजे त्याचा कच्चा वास पूर्णपणे निघून जाईल आणि चव खुलून येईल.

३. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. टोमॅटो नीट कुस्करुन झाले की त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि मीठ घालून मसाला परतून घ्या. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतल्यावर त्यात शिजवलेले वाटाणे घाला.

४. हे सगळं एकत्र करून त्यात थोडं पाणी घाला आणि रगडा छान उकळू द्या. रगडा फार घट्ट नको आणि फार पातळही नको. मध्यमसर ग्रेव्हीदार असला की चाट छान लागते. शेवटी थोडा गरम मसाला घालून रगडा ढवळून घ्या. 

५. सर्व्ह करताना एका प्लेटमध्ये गरमागरम रगडा घाला. त्यावर उकडलेल्या बटाट्याचे तुकडे पसरवा. आता त्यावर बारीक चिरलेला कांदा, थोडा टोमॅटो घालून त्यावर हिरवी चटणी आणि चिंचेची गोड चटणी घाला. यानंतर वरून भरपूर शेव, कोथिंबीर घाला आणि लिंबाचा रस पिळा. सगळं हलकं एकत्र करून लगेच सर्व्ह करा. गरम रगडा आणि थंडगार चटण्या यांचा कॉम्बिनेशन खूपच चविष्ट लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Spicy and Tangy Ragda Chaat: A Delicious and Nutritious Recipe

Web Summary : Ragda Chaat, Mumbai's popular street food, combines white peas, potatoes, chutneys, and spices for a flavorful experience. This recipe offers a balance of sweet, sour, and spicy tastes, perfect for snacks or entertaining guests.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स