Lokmat Sakhi >Food > आज काय भारी खाऊ देणार? या प्रश्नाचं प्रत्येक आईसाठी खास उत्तर, करा पोहे रवा-बाईट्स

आज काय भारी खाऊ देणार? या प्रश्नाचं प्रत्येक आईसाठी खास उत्तर, करा पोहे रवा-बाईट्स

Make Delicious Pohe-Rava Bites For Children : पोहे व रवा एकत्र करून तयार करा हा चमचमीत पदार्थ. पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 08:15 IST2025-03-11T08:12:42+5:302025-03-11T08:15:01+5:30

Make Delicious Pohe-Rava Bites For Children : पोहे व रवा एकत्र करून तयार करा हा चमचमीत पदार्थ. पाहा रेसिपी.

Make Delicious Pohe-Rava Bites For Children | आज काय भारी खाऊ देणार? या प्रश्नाचं प्रत्येक आईसाठी खास उत्तर, करा पोहे रवा-बाईट्स

आज काय भारी खाऊ देणार? या प्रश्नाचं प्रत्येक आईसाठी खास उत्तर, करा पोहे रवा-बाईट्स

मुलांना मधल्या सुट्टीमध्ये काही तरी अरबट-चरबट खायची सवय असते. लहान मुलच कशाला मोठ्यांनाही मध्येच काहीतरी खायची हुक्की येते. मग चिप्स, तळलेले तेलकट पदार्थ असं काही आपण खातो. ( Make Delicious Pohe-Rava Bites For Children )त्याऐवजी काही तरी पौष्टिक खाणे कधीही चांगले. 

अशा अनेक रेसिपी असतात ज्या सहज तयार करता येतात आणि चवीलाही फार छान असतात. ( Make Delicious Pohe-Rava Bites For Children )पौष्टिकही असतात. त्यामुळे बिनधास्त खाता येतात. लहान मुलांना द्यायलाही काही वाटत नाही. अशीच एक छान रेसिपी अनिता मोहनने शेअर केली आहे. जी तुम्हाला नक्कीच फार आवडेल.

साहित्य :( Make Delicious Pohe-Rava Bites For Children )
पोहे, पाणी, रवा, दही, मीठ, काळे तीळ, कोथिंबीर, तेल, मोहरी, पांढरे तीळ, हिरवी मिरची, चिली फ्लिक्स

प्रमाण
जर २ वाटी पोहे वापरत असाल तर, ते दिड वाटी पाण्यामध्ये भिजवायचे. रवा पोह्यांपेक्षा जरा जास्त घ्यायचा. २ वाटी पोह्यांसाठी ३ वाटी रवा घ्या. एवढ्या रव्यासाठी अर्धी वाटी दही पुरेसे आहे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणीही घाला.   

कृती:
१. पोहे छान धुऊन घ्या. नंतर थोड्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजवत ठेवा. 
२. रव्यामध्ये दही घाला आणि ते मिश्रण नीट मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवा. त्यात गरजेनुसार पाणी घाला. 
३. दोन्ही पदार्थ व्यवस्थित मुरल्यानंतर पोहे व रवा छान एकजीव करून घ्या. मळून त्याचे पीठ तयार करून घ्या. त्यामध्ये मीठ घाला.  काळे तीळ घाला. छान बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला. सगळं मिश्रण मस्त मिक्स करून घ्या.  
४. तयार पीठाचे लहान-लहान चपटे गोळे करून घ्या.  त्यांना थोडं तेल लावा.
५. आता ते गोळे छान वाफवून घ्या. त्यासाठी इडली पात्राचा वापर करा. जर इडली पात्र नसेल तर मग कुकरही वापरू शकता. १० मिनिटांमध्ये सगळे गोळे छान तयार होतील.    


६. एका कढईमध्ये मोहरीची फोडणी तयार करा. त्यामध्ये पांढरे तीळही घाला आणि छान परतून घ्या. हिरव्या मिरचीचे तुकडेही छान परतून घ्या. आता त्यामध्ये वाफवलेले रवा-पोह्याचे बाईट्स घाला. चिली फ्लिक्स घाला. जरा वेळ छान परतून घ्या. आवडत्या चटणीशी लाऊन खा.        


Web Title: Make Delicious Pohe-Rava Bites For Children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.