उन्हाळ्यात जास्त वेळ स्वयंपाक घरात थांबणे म्हणजे शरीरच नाही तर डोकं पण तापतं. त्यामुळे झटपट होणाऱ्या आणि पोटावर ताण न आणणाऱ्या रेसिपी उन्हाळ्यात कराव्यात. त्यात अनेक पदार्थांचा समावेश होते त्यापैकीच एक म्हणजे रस्सम भात. (Make delicious one pot rasam rice in 10 minutes, very rich in taste, good for the stomach)मात्र यासाठी भात आणि रस्सम वेगळं तयार करायची गरज नाही. एकाच कुकरमध्ये चविष्ट रस्सम राईस करता येतो. पाहा सोपी रेसिपी.
साहित्य तांदूळ, तूर डाळ, पाणी, काळीमिरी, जिरे, कडीपत्ता, सुकी लाल मिरची, लसूण, तेल, मोहरी, टोमॅटो, हळद, लाल तिखट, चिंच, रस्सम पावडर, कोथिंबीर, तूप
कृती१. एका भांड्यात वाटीभर तांदूळ आणि वाटीभर तूर डाळ भिजत ठेवायची. प्रमाण समान ठेवा बाकी तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी करायचे आहे त्यानुसार डाळ-तांदूळ घ्यायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. चिंच वाटीत भिजत ठेवायची. कोमट पाण्यात भिजवा नंतर कुस्करुन घ्या आणि गाळून घ्या. त्याचा चोथा काढून टाका.
२. मिकसरच्या भांड्यात सुकी लाल मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात थोडी काळीमीरी घालायची. तेसच कडीपत्ताही घालायचा आणि लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. जाडसर मसाला वाटून घ्यायचा. पेस्ट करु नका. जाडसरच ठेवा.
३. एका कुकरमध्ये तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाले की त्यात मोहरी घालायची. थोडा कडीपत्ता घालायचा. थोडे जिरे घालायचे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या. परतून घ्यायचे. सुकी लाल मिरची घालायची आणि वाटून घेतलेला मसालाही घालायचा. सगळं खमंग परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो जास्त घ्यायचा.
४. त्यात रस्सम पावडर घालायची. चमचाभर हळद घालायची. लाल तिखट घालायचे, चवीनुसार मीठ घालायचे. सगळं मस्त परतून घ्यायचं. त्यात चिंचेचा कोळ घालायचा आणि भिजवलेले तांदूळ डाळीचे मिश्रण घालायचे. ढवळून घ्यायचे. गरजेनुसार पाणी घालायचे. पाणी जरा जास्त ठेवा म्हणजे भात मऊ होतो.
५. कुकर लावायचा आणि एखादी शिटी जास्तच काढायची. म्हणजे चव जास्त छान लागते. सोबतीला पापड घ्यायचा. कुकर उघडल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि तूप घाला. गरमागरम खा. नक्की आवडेल.
Web Summary : Make flavorful rasam rice in one pot within minutes! This simple recipe combines rice, lentils, spices, and tamarind for a comforting, quick meal. Perfect for hot summer days!
Web Summary : मिनटों में एक बर्तन में स्वादिष्ट रसम राइस बनाएं! यह आसान रेसिपी चावल, दाल, मसाले और इमली को मिलाकर एक आरामदायक, झटपट भोजन बनाती है। गर्मी के दिनों के लिए बिल्कुल सही!