Join us

दलिया व मूग डाळीची करा मस्त मसाला खिचडी.. वजन वाढण्याची चिंता मुळीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2025 08:35 IST

Make delicious masala khichdi with oatmeal and moong dal पौष्टिक दलिया खिचडी आरोग्यासाठी चांगली असते. नक्की खाऊन बघा.

अत्यंत पौष्टिक अशी मूग डाळ व दलियाची खिचडी आठवड्यातून एकदा तरी खायला हवी. (Make delicious masala khichdi with oatmeal and moong dal)वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी ही रेसिपी पाहा आणि नक्की करा.  

साहित्यदलिया, मूग डाळ, पाणी, मीठ, हळद, लाल तिखट, गाजर, कांदा, तूप, मटार, जिरे, कडीपत्ता, टोमॅटो, कोथिंबीर, सोयाबिन, आलं, लसूण 

कृती१. एका भांड्यामध्ये दलिया घ्या. त्यामध्ये मूग डाळ घाला. वाटीभर दलिया घेत असाल तर तेवढीच मुगाची डाळही वापरा. (Make delicious masala khichdi with oatmeal and moong dal)दोन्ही पदार्थ मिक्स करा आणि मस्त स्वच्छ धुऊन घ्या. तीन ते चार वेळा पाण्यातून काढा. नंतर पाण्यामध्ये ठेऊन द्या.

२. लसूण सोलून घ्या. गाजर छान लांब कापून घ्या. कांदाही छान बारीक चिरुन घ्या. तसेच टोमॅटोही लांब किंवा बारीक चिरुन घ्या. 

३. एका पातेल्यामध्ये पाणी घ्या ते गरम करत ठेवा. त्यामध्ये थोडे मीठ घाला. आणि मग सोयाबिन घाला. छान मऊ होऊ द्या. सोयाबिन व्यवस्थित शिजवून घ्या. दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी व मीठ घ्या. त्यामध्ये मटारचे दाणे टाका. ते ही छान शिजवून घ्या. 

४. एका कुकरमध्ये थोडे तूप घ्या. त्यामध्ये कडीपत्ता टाका. जिरे टाका. जिरे छान तडतडू द्या. जिऱ्याचा छान खमंग वास आल्यावर त्यामध्ये किसलेले आले घाला. लसणाच्या पाकळ्याही घाला. ते व्यवस्थित परतून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. तसेच गाजराचे तुकडे घाला. टोमॅटो घाला. सगळं छान परतून घ्या. कांदा जरा गुलाबी झाला की त्यामध्ये सोयाबिन घाला. तसेच शिजवलेले मटारचे दाणेही घाला. ते ही मस्त परतून घ्या. मग त्यामध्ये हळद घाला तसेच लाल तिखट घाला. सगळं छान एकजीव करुन घ्या. मग त्यामध्ये दलिया आणि मूग डाळीचे मिश्रण घाला.

५. थोडावेळ परतल्यावर त्यामध्ये पाणी घाला. मऊ खिचडी करताना जेवढे पाणी वापरता तेवढेच पाणी वापरा. नीट ढवळून घ्या. नंतर कुकरचे झाकण बंद करा आणि चार ते पाच शिट्या काढा. कुकर उघडल्यावर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. खायला घेताना वरतून छान तुपाची धार सोडा.       

टॅग्स :आहार योजनाअन्नपाककृतीआरोग्य