घरच्या घरी लावलेलं दही हे केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतं. पण अनेकदा दही पातळ होतं, आंबट लागतं किंवा त्यात क्रीमीपणा येत नाही, अशी तक्रार ऐकायला मिळते. खरं तर मस्त घट्ट, मऊ आणि क्रिमी दही तयार करण्यासाठी काही साध्या गोष्टींची काळजी घेतली, तर घरचं दही अगदी बाजारातल्यासारखं किंवा त्याहूनही चांगलं बनू शकतं.
दही लावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधाची निवड. फुल-फॅट म्हणजेच साययुक्त दूध वापरलं, तर दही अधिक घट्ट आणि क्रीमी होतं. टोंड किंवा स्किम्ड दूध वापरल्यास दही पातळ पडण्याची शक्यता जास्त असते. दूध उकळताना ते नीट उकळून घ्यावं आणि थोडंसं आटवून घेतलं, तर दह्याला नैसर्गिक घट्टपणा येतो. (Make creamy, soft and white curd at home, 3 rules and see the magic)उकळलेलं दूध पूर्ण थंड न करता कोमट अवस्थेत आणणं खूप गरजेचं आहे. खूप गरम दुधाचं दही लागत नाही, दुधात बोट घालता येईल एवढेच गरम दूध असावे.
आधीचं दही जे विर्झणासाठी वापरणार आहात ते ही तितकंच महत्त्वाचं असतं. ताजं आणि जास्त आंबट नसलेलं दही वापरलं, तर तयार होणारं दही चविष्ट लागतं. प्रमाणही योग्य असावं जास्त दही घातलं, तर दही आंबट होतं, आणि कमी घातलं, तर नीट सेट होत नाही. दही दुधात मिसळताना ते हलक्या हाताने एकजीव करावं, जोरात ढवळल्यास दह्याच्या पोतावर परिणाम होतो. किमान ३० वेळा तरी ढवळून घ्यावे.
दही सेट होण्यासाठी उबदार वातावरण खूप आवश्यक असतं. विशेषतः हिवाळ्यात भांडं कापडात गुंडाळून ठेवणं किंवा उबदार जागी ठेवणं फायदेशीर ठरतं. एकदा दही लावून ठेवलं की ते भांडं वारंवार हलवू नये, कारण त्यामुळे दही व्यवस्थित घट्ट बसत नाही. साधारण सहा ते आठ तास दह्याला लागतात, त्यामुळे मध्येच उघडून पाहण्याची घाई करू नये.
क्रीमी दही मिळवण्यासाठी काही खास टिप्सही उपयोगी ठरतात. दूध थोडं आटवून घेणं, किंवा त्यात थोडी दूध पावडर मिसळणं यामुळे दह्याला अधिक घट्ट आणि मऊसर टेक्स्चर येतं. तसेच मातीच्या भांड्यात दही लावलं, तर त्यातील अतिरिक्त पाणी शोषलं जातं आणि दही अधिक चविष्ट होतं. अशा छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर घरचं दही अगदी परफेक्ट तयार होतं. घट्ट, मऊ आणि चविष्ट. एकदा ही पद्धत जमली, की रोजच मस्त दही लागतं.
Web Summary : Homemade curd can be thick, creamy, and delicious with a few simple steps. Use full-fat milk, lukewarm temperature, fresh curd as starter, and a warm environment. Following these rules ensures perfect curd every time.
Web Summary : कुछ आसान चरणों के साथ घर का बना दही गाढ़ा, मलाईदार और स्वादिष्ट हो सकता है। फुल-फैट दूध, गुनगुना तापमान, ताजा दही का उपयोग करें और गर्म वातावरण बनाए रखें। इन नियमों का पालन करने से हर बार सही दही बनता है।