Lokmat Sakhi >Food > ओल्या नारळाची वडी करा झटपट- मऊ, लुसलुशीत अशी ही वडी जि‍भेवर ठेवताच विरघळेल

ओल्या नारळाची वडी करा झटपट- मऊ, लुसलुशीत अशी ही वडी जि‍भेवर ठेवताच विरघळेल

Make coconut barfi in no time, soft-sweet and delicious recipe, must try : ओल्या नारळाची वडी करायची सोपी पद्धत. पाहा कशी करायची नारळ वडी झटपट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 13:05 IST2025-09-02T13:02:13+5:302025-09-02T13:05:16+5:30

Make coconut barfi in no time, soft-sweet and delicious recipe, must try : ओल्या नारळाची वडी करायची सोपी पद्धत. पाहा कशी करायची नारळ वडी झटपट.

Make coconut barfi in no time, soft-sweet and delicious recipe, must try | ओल्या नारळाची वडी करा झटपट- मऊ, लुसलुशीत अशी ही वडी जि‍भेवर ठेवताच विरघळेल

ओल्या नारळाची वडी करा झटपट- मऊ, लुसलुशीत अशी ही वडी जि‍भेवर ठेवताच विरघळेल

खोबर्‍याची वडी तर आपण नेहमी करतोच. पण एकदा ही ताज्या-ओल्या नारळाची वडी खाऊन पाहा. नक्की आवडेल. करायला अगदी सोपी आहे. तसेच कमी साहित्यात करता येते. (Make coconut barfi in no time, soft-sweet and delicious recipe, must try)कोकणात घरोघरी वरचेवर केली जाते. प्रसादासाठी तसेच गोडाचा पदार्थ म्हणून अगदी मस्त पदार्थ आहे. एका नारळातही बऱ्याच वड्या होतात. तसेच तूप - साखर जास्त वापरावी लागत नाही. इतरही पदार्थ आवडीनुसार घालू शकता. नक्की करुन पाहा. 

साहित्य
नारळ, साखर, तूप, दूध पावडर, दुधाची साय, वेलदोडे, सुकामेवा 

कृती
१. नारळाची वडी करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नारळ ताजा घेणे. खवून फ्रिजमध्ये ठेवलेला नारळ अजिबात घेऊ नका. ताजाच घ्या. नारळ खवून घेतल्यावर एका पॅन मध्ये चमचाभर तूप घ्यायचे. त्यावर नारळ घालायचा आणि परतायचा. त्यात साखर घालायची. दोन वाटी नारळाला एक वाटी साखर असे प्रमाण लक्षात ठोवा. ताजा नारळ मुळात गोड असतो. त्यामुळे साखर बेतानेच घाला. 

२. साखर आणि नारळ छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे. त्याचे मिश्रण जरा पातळ होईल. पाणी कमी होईल आणि त्याला घट्टपणा यायला लागेल. मग त्यात वेलदोड्यांची पूड घालायची. अगदी चमचाभर पूड घालायची. जास्त नाही.

३. सुकामेवा आवडीचा घ्या. बदाम, काजू, पिस्ता, मनुका जे आवडेल ते घ्या. जरा बारीक करुन घ्यायचा. सुकामेवाही मिश्रणात घालून परतायचा. एका वाटीत चमचाभर दूध पावडर घ्यायची. त्यात दोन चमचे साय घालायची आणि मिश्रण एकजीव करुन घ्यायचे. ते मिश्रण पॅनमध्ये ओतायचे. सगळे पदार्थ छान ढवळायचे. एका वाटीत पाणी घ्या. त्यात मिश्रणाचा लहान गोळा करुन टाका. त्याने आकार सोडला नाही याचा अर्थ मिश्रण अगदी तयार आहे. 

४. एका ताटलीला तूप लावायचे. त्यावर तयार मिश्रण थापायचे. जरा कोमट असताना थापा. म्हणजे वडी छान मऊ पडेल. जरा गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. फारच चविष्ट आणि मऊ होतात. नक्की करुन पाहा.  
 

Web Title: Make coconut barfi in no time, soft-sweet and delicious recipe, must try

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.