Join us
Daily Top 2Weekly Top 5

न लाटता, न पीठ मळता झटपट करा चपात्या; १ सोपी ट्रिक, झटपट होतील चपात्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 14:51 IST

How To Make Chapati Quickly : या पद्धतीत तुम्हाला फक्त द्रावण तव्यावर घालायचं आहे. ज्यामुळे मऊ-फुललेल्या चपात्या तयार होतील

भारतीय स्वंयपाकघरात चपात्या नेहमीच केल्या जातात (Cooking Hacks). पण  रोजचं काम करणं इतकंही सोपं नसतं, आधी तासनतास पीठ मळा नंतर ते लाटून घ्या. खासकरून व्यस्त जीवनशैलीत वेळ वाचवण्यासाठी तुम्ही कमीत कमी वेळेत चपात्या करू शकता. चपात्या करण्यासाठी टेंशन घेण्याची काही गरज नाही. न लाटता न पीठ मळता केलेल्या या चपातीला बॅटर रोटी किंवा लिक्वीड रोटी असं म्हणतात. या पद्धतीत तुम्हाला फक्त द्रावण तव्यावर घालायचं आहे. ज्यामुळे मऊ-फुललेल्या चपात्या तयार होतील. (How To Make Chapati Quickly)

ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला पीठ मळावं लागणार नाही. पाणी मिसळून मिश्रण तयार करायचं आहे. सगळ्यात आधी एका स्वच्छ बाऊलमध्ये १ कप गव्हाचं पीठ घ्या. सामान्य पिठासाठी पाण्याची गरज जितकी असते त्याच्या ३ पट जास्त पाणी घाला. जर तुम्ही २ कप पीठ घेणार असाल तर जास्त पाणी घालू शकता.  जर पीठ घट्ट असेल तर ते पातळ  करण्यासाठी थोडं अजून पाणी घाला.

हे बॅटर तव्यावर सहज पसरवता येतं. या बॅटरची कंसिस्टंसी पातळ असल्यास चपात्या मऊ, फुललेल्या होण्यास मदत होईल. हे मिश्रण एकसंथ असायला हवं. पाणी घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. यासाठी एका मोठ्या चमच्याचा वापर करा.  या बॅटरमध्ये थोडं तेल घाला. तेल घातल्यानं चपात्या मऊ राहण्यास मदत होते. तव्यावर डोसा चिकट होत नाही. हवंतर तुम्ही ही पायरी स्किप करू शकता. 

तवा गरम करून त्यावर बॅटर घाला आणि चपातीला गोल आकार द्या. तव्याला मंद ते मध्यम आचेवर गरम करून घ्या. तवा गरम झाल्यानंतर त्यात व्यवस्थित बॅटर घाला.  तवा हलका गरम करून  घ्या. चमच्याच्या साहाय्यानं बॅटर तव्याच्या मधोमध पसरवा.  तुम्ही तवा हॅण्डलनेसुद्धा फिरवू शकता. चपाती योग्यवेळी उलटी करणं गरजेचं आहे. जेणेकरून चपाती जळणार नाही. चपाती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्या. यादरम्यान आच मध्य ते उच्च ठेवा जेणेकरून चपाती जळणार नाही.

जेव्हा चपाती दोन्ही हातांनी शेकाल तेव्हा किनाऱ्यांवर हलक्या हातानं दाबा. दाबल्यामुळे चपातीतून हवा बाहेर निघण्याऐवजी चपातीत दबाव येईल ज्यामुळे चपाती फुगेल. ही क्रिया पारंपारीक चपाती करण्याप्रमाणेच काम करेल. ज्यामुळे तुम्हाला चपाती करण्याची मेहनत करावी लागणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Chapati Recipe: No Kneading, No Rolling, Just Quick Cooking!

Web Summary : Make chapatis quickly without kneading or rolling! This batter roti recipe uses a simple liquid batter spread on a pan, resulting in soft, fluffy chapatis. Just mix flour, water, and oil, then cook like a pancake. A super easy time-saving method!
टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न