Join us

इटुकला-पिटुकला बन डोसा करा झटपट, मऊ-चविष्ट आणि मसालेदार- खास नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 18:29 IST

Make Bun Dosa quickly, soft-tasty and spicy- special breakfast South Indian style : बन डोसा करायची अगदी सोपी पद्धत. नक्की आवडले एकदा खाऊन पाहाच.

साहित्य रवा, दही, पाणी, मीठ, तेल, जिरे, मोहरी, चणा डाळ, कांदा, कोथिंबीर, बेकींग सोडा, कडीपत्ता, हळद  

कृती१. वाटीभर रवा घेत असाल तर वाटीभर दही घ्यायचे. जास्त घेतले तरी चालेल. सगळ्यात आधी रवा छान चाळून घ्यायचा. रवा एका खोलगत पातेल्यात ठेवायचा. (Make Bun Dosa quickly, soft-tasty and spicy- special breakfast South Indian style)रव्यामध्ये दही घालायचे. दही घातल्यावर पाणी घालायचे. एक कप दही एक कप रवा असेल तर अर्धा कप पाणी घ्यायचे. पाणी जास्त लागले तरी घ्या. मात्र पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची. मध्यम पातळ ठेवायचे. दही, पाणी आणि रवा मस्त मिक्स करायचा. झाकून ठेवायचे.  

२. कांदा सोलायचा आणि छा बारीक चिरायचा. तसेच कोथिंबीरही अगदी बारीक चिरुन घ्यायची. एका कढईत थोडे तेल घ्यायचे. तेलावर जिरे परतायचे. (Make Bun Dosa quickly, soft-tasty and spicy- special breakfast South Indian style)जिरे फुलल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडल्यावर त्यात कडीपत्याची पाने घालायची. सगळे पदार्थ मस्त  परतायचे. मग त्यात चणा डाळ घालायची. अगदी चमचाभर बास होते. ती व्यवस्थित परतायची. परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायची. कांदा खमंग गुलाबी परतायचा. कांदा परतून झाल्यावर त्यात छान बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालायची. सगळे पदा४थ छान परतून घ्यायचे.

३. तयार केलेल्या पीठात चमचाभर हळद घालायची. किंवा फोडणीत घातली तरी चालेल. पीठात थोडा बेकींग सोडा घालायची आणि पीठ मिक्सरमधून एकदा वाटून घ्यायचे. असे केल्याने छान पातळ पीठ मिळते. पीठ पुन्हा भांड्यात काढून घ्यायचे. त्यात तयार केलला कांद्याचा मसाला घालायचा. व्यवस्थित ढवळायचे. ढवळून झाल्यावर त्यात गरज असेल तर पाणी घाला. 

४. फोडणीसाठी लहानसे जे कढले आपण वापरतो ज्याला फोडणी मात्र म्हणतात. आकाराला ते गोल असते. त्यात थोडे तेल घालून ते गरम करुन घ्यायचे. मग त्यात चमचाभर पीठ घालायचे आणि व्यवस्थित कुरुकुरीत होऊ द्यायचे. मग पलटायचे आणि दोन्ही बाजूंनी शिजवून घ्यायचे. मस्त फुगीर आणि मऊ होतात.        

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स