Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > दहा मिनिटांत होणारे बंगाली चाट - 'चूरमूर' हा पदार्थ म्हणजे जिभेसाठी मेजवानीच, पाहा कसा करायचा

दहा मिनिटांत होणारे बंगाली चाट - 'चूरमूर' हा पदार्थ म्हणजे जिभेसाठी मेजवानीच, पाहा कसा करायचा

Make Bengali chaat in ten minutes - 'Churmur' is a feast for the tongue, see how to make it : दहा मिनिटांत करा हा चमचमीत पदार्थ. चाटचा एकदम भारी प्रकार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2025 17:02 IST2025-10-28T17:00:38+5:302025-10-28T17:02:29+5:30

Make Bengali chaat in ten minutes - 'Churmur' is a feast for the tongue, see how to make it : दहा मिनिटांत करा हा चमचमीत पदार्थ. चाटचा एकदम भारी प्रकार.

Make Bengali chaat in ten minutes - 'Churmur' is a feast for the tongue, see how to make it | दहा मिनिटांत होणारे बंगाली चाट - 'चूरमूर' हा पदार्थ म्हणजे जिभेसाठी मेजवानीच, पाहा कसा करायचा

दहा मिनिटांत होणारे बंगाली चाट - 'चूरमूर' हा पदार्थ म्हणजे जिभेसाठी मेजवानीच, पाहा कसा करायचा

भारतात भेळ, पाणीपुरी, आलू टिक्की प्रसिद्ध हे चाटचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. तसेच बंगालमध्ये 'चूरमूर' हा चाटचा खास प्रकार लोकांच्या जिभेवर राज्य करतो. अगदी साधा सोपा असा हा पदार्थ घरोघरी केला जातो. चूरमूर म्हणजे खमंग आणि थोडा तिखट-खारट-गोड असा हा पदार्थ असतो. (Make Bengali chaat in ten minutes - 'Churmur' is a feast for the tongue, see how to make it)यात फुटका पापडी म्हणजेच पाणीपुरीच्या पुऱ्यांचा चुरा, चणे, उकडलेले बटाटे, कांदा, आदी बेसिक पदार्थच वापरले जातात. शेवटी त्यावर मसाले घालून लिंबू पिळल्यावर त्याची चव अप्रतिम लागते. नाव जरी साधं असलं तरी या चाटमध्ये बंगालचा मसालेदारपणा आणि गोडवा दोन्ही जाणवतो.
कोलकात्याच्या रस्त्यांवर किंवा छोट्या गल्लीबोळांत चूरमूरची दुकाने दिसतात. हा पदार्थ हलका, झटपट आणि कुठल्याही वेळी खाता येतो, म्हणूनच तो तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडतो.

साहित्य 
पाणीपुरीच्या पुऱ्या, बटाटा, काळे चणे, कोथिंबीर, लिंबू, मीठ, चिंच, कांदा, हिरवी मिरची, लाल तिखट, चाट मसाला, काबुली चणे, गूळ 

कृती
१. बटाटे उकडून घ्या. तसेच काळे चणेही उकडून घ्यायचे. कोथिंबीरीची जुडी निवडून घ्यायचे. धुवा आणि मस्त बारीक चिरुन घ्या. काबुली चणेही उकडून घ्यायचे. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. हिरव्या मिरचीचेही अगदी बारीक तुकडे करायचे. 

२. एका वाटीत गरम पाण्यात चिंच भिजवा. त्यात बारीक चिरलेला गूळ घाला आणि एकत्र करा. हाताने कुस्करुन घ्यायचे. त्यातून चोथा काढून घ्यायचा. बिया काढायच्या. फक्त रस गाळून घ्यायच्या. 

३. एका खोलगट परातीत पाणीपुरीच्या पुऱ्या चुरुन घ्यायच्या. कुस्करलेला बटाटा त्यात घाला. त्यात लिंबाचा रस घालायचा आणि काबुली चणेही कुस्करुन घालायचे. काळे चणेही कुस्करुन घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. तसेच चिंचे पाणी घालायचे. बारीक चिरलेला कांदा घाला. चमचाभर लाल तिखट घाला, चमचाभर चाट मसाला घाला, मीठ घाला आणि सारे पदार्थ मिक्स करुन घ्यायचे. हाताने कालवा. 

Web Title : बंगाली चुरमुर: दस मिनट में बनने वाला चटपटा चाट।

Web Summary : चुरमुर बंगाल का लोकप्रिय स्ट्रीट फूड है, जो झटपट और स्वादिष्ट चाट है। इसमें कुटी हुई पापड़ी, आलू, चना और मसाले मिलाकर तीखा, चटपटा और मीठा स्वाद मिलता है। मिनटों में तैयार, यह कोलकाता का पसंदीदा है।

Web Title : Bengali Churmur: A ten-minute tongue-tingling chaat recipe.

Web Summary : Churmur, a popular Bengali street food, is a quick and flavorful chaat. It combines crushed papdi, potatoes, chickpeas, and spices, offering a spicy, tangy, and sweet taste. Ready in minutes, it's a Kolkata favorite.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.