पोहे म्हटलं की, फोडणीचे पोहे लगेच डोक्यात येतात. नाश्त्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पोहे वापरणे फारच कॉमन आहे. (Make Authentic Marathi Dadpe Pohe, See 2 Recipes)फक्त फोडणीचे पोहेच नाही तर, ताकातले पोहे, दुधातले पोहे ही खाल्ले जातात. काही जणं तर चाहा पोहेही नाश्त्याला खातात. तसाच पोह्यांचा आणखी एक छान प्रकार आहे, तो म्हणजे दडपे पोहे. गावागावातून तयार करण्याची पद्धत वेगळीच. (Make Authentic Marathi Dadpe Pohe, See 2 Recipes)पण चवीला मस्तच लागतात. दडपे पोहे तयार करण्याच्या या दोन सोप्या पद्धती पाहा.
१. साहित्य
पातळ पोहे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, टोमॅटो, काकडी, ओलं खोबरं, हळद, लिंबाचा रस, जिरं,मीठ
कृती:
१. एका ताटामध्ये पातळ पोहे घ्या. त्यावरती कांदा एकदम बारीक असा चिरून घाला. नंतर टोमॅटो बारीक चिरून घाला. काकडीही चिरून घाला.
२. ओलं खोबरं छान खवून घ्यायचं. तेही पोह्यांच्या मिश्रणात घालायचं. कोथिंबीरही बारीक चिरून घालायची. वरतून लिंबाचा रसही पिळून घ्यायचा.
३. जिऱ्याची फोडणी तयार करायची. त्यामध्ये हिंग घालायचे. त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. हळद घालायची.
४. पोह्यांच्या मिश्रणामध्ये तयार फोडणी ओतायची. सगळं मस्त मिक्स करून घ्या. मीठ घाला. त्यावरती लिंबू पिळा आणि मग मऊ पडण्याआधी ते फस्त करून टाका.
२. साहित्य
पातळ पोहे, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, टोमॅटो, काकडी, ओलं खोबरं, पापड, लिंबाचा रस, सांडगी मिरची, मीठ
कृती
१. पातळ पोहे छान परतून घ्यायचे. जरा कुरकुरीत झाले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे.
२. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर छान बारीक चिरून घालायची. टोमॅटोही बारीक चिरून घालायचा. काकडीही छान बारीक चिरून घालायची.
३. सांडगी मिरची तळून घ्यायची. कुसकरून घ्यायची. मग त्यामध्ये ओलं खोबरं छान खवून घालायचे.
४. चवीपुरते मीठ घालायचे. लिंबू पिळायचा. पापड तळून घ्यायचा आणि मग तो मोडून त्या पोह्यांमध्ये घालायचा.