साऊथ इंडियन पदार्थ आवडतात का ? नाश्त्यासाठी फारच उत्तम असे पर्याय साऊथच्या खाद्य पदार्थांत आहेत. इडली असो वा मेदूवडा भारतभरात आवडीने खाल्ले जाते. तसेच डोसाही साऊथचाच पदार्थ आहे. (Make Annastyle Utthappam at home in no time - Nutritious and tasty dish, perfect recipe for breakfast)मुंबईत फार लोकप्रिय असलेला अप्पमही साऊथ इंडियन पदार्थ आहे. आणखी एक फार आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे ओनियन उत्तप्पा किंवा उतप्पम. हा पदार्थ फार साधा असतो मात्र चवीला एकदम भारी. घरी उत्तप्पम करणे अगदी सोपे आहे. फारच साधी रेसिपी आहे. तसेच पौष्टिकही असते नक्की करा. लहान मुलेही आवडीने खातील.
साहित्य
उडीद डाळ, तांदूळ, मेथी दाणे, पाणी, तेल, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, पोहे, हिरवी मिरची
कृती
१. तीन वाटी तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे त्यात अगदी चमचाभर मेथी दाणे घालायचे. तसेच वेगळ्या भांड्यात वाटीभर उडदाची डाळ भिजत ठेवायची. एकत्र भिजवणे टाळा. वेगळे भिजवायचे. म्हणजे वाटताना जास्त छान वाटले जाते. तीन तासासाठी भिजवायचे रात्रभर भिजवायची गरज नाही. तीन तासांनंतर तांदूळ वाटून घ्या. पाणी न घालता वाटायचे. जाडसर वाटा. गरज असेल तर अगदी थोडे पाणी घाला. तसेच डाळही वाटून घ्या. छान पेस्ट करायची. पोहे भिजवायचे. पोह्यात थोडे पाणी घालून वाटायचे. अगदी वाटीभर पोहे घ्यायचे. कमीही चालतात. सारे छान वाटून घेतल्यावर त्यात पळीने ढवळून पीठ छान एकजीव आणि सैल करुन घ्यायचे. शक्यतो पाणी जास्त लागत नाही. मध्यम घट्ट असे पीठ तयार करायचे.
२. कांदा सोलायचा आणि व्यवस्थित बारीक चिरायचा. तसेच टोमॅटोही छान बारीक चिरायचा. हिरवी मिरची ही छान बारीक चिरायची. कोथिंबीरीची छान ताजी जुडी घ्या आणि निवडून छान बारीक चिरा. कांदा अगदी बारीक चिरायचा म्हणजे छान कुरकुरीत होतो.
३. एका तव्याला तेल लावायचे. त्यावर तयार केलेल्या पिठाचे उत्तप्पम घालायचे. त्यात छान जाळी तयार होते. कांदा , टोमॅटो आणि कोथिंबीर एकत्र करा. त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला आणि उत्तप्पावर हाताने ते मिश्रण थापा. एका बाजूने खमंग परतून झाल्यावर पलटून दुसरी बाजूही खमंग परता. दोन्ही बाजू छान परतून झल्यावर गरमागरम उत्तप्पम चटणीसोबत खा.