रोज जेवायला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. तसेच रोज नाश्त्याला काय करायचे हा ही प्रश्न असतोच. काही तरी वेगळा पदार्थ मिळाला तर खायला मज्जा येते. (Make a tomato omelette for breakfast! delicious and easy to make)मात्र नाश्त्याला तेच तेच पदार्थ सारखे केले जातात आणि मग लहान काय मोठेही खायला कुरकुर करतात. इडली, मेदुवडा असे पदार्थही आपण करतोच. मात्र करायला जरा वेळ जास्त लागतो. कामाला जायचे असते मुलांना शाळेत सोडायचे असते इतरही कपडे भांडी करायची असतात. नुसती घाई-घाई. म्हणून मग उपमा पोहे घरी जास्त केले जातात. कारण ते करायला वेळ कमी लागतो.
हा एक असा पदार्थ आहे जो होतोही लवकर आणि लागतोही मस्त. टोमॅटो आमलेट हा एक शाकाहारी पदार्थ आहे. (Make a tomato omelette for breakfast! delicious and easy to make)दिसायला आमलेट सारखा असतो. म्हणून आमलेट असे नाव पडले. अगदी कमी सामानात झटपट करता येणारा असा हा पदार्थ आहे.
साहित्य
टोमॅटो, कांदा, बेसन, हिरवी मिरची, मीठ, लाल तिखट, जिरे, कोथिंबीर, पाणी, तेल
कृती
१. मस्त लाल-लाल पिकलेले टोमॅटो घ्या. छान बारीक चिरुन घ्या. टोमॅटो जरा जास्त घ्यायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. कांदा मस्त बारीक चिरुन घ्या.
२. एका खोलगट पातेल्यात बेसनाचे पीठ घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा घाला. नंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. तसेच मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. भरपूर टोमॅटो घालायचा. लाल तिखट घाला. तुम्हाला जेवढं तिखट आवडेल त्यानुसार तिखट घालायचे.
३. चवीपुरते मीठ घाला. सगळं छान मिक्स करा. मग त्यात पाणी घालायचे. जिरे घालायचे. अति पातळ करु नका. घट्टही ठेऊ नका. मिश्रण जरा छान एकजीव करुन घ्या. सगळं छान एकजीव झाल्यावर त्यात चमचाभर गरम तेल घाला. छान ढवळून घ्या.
४. पॅन गरम करत ठेवा. जरा पॅन तापल्यावर त्याला तेल लाऊन घ्या. मग मिश्रण पॅनमध्ये पसरवून घ्या. झाकून ठेवा. पॅनवरून ते सुटायला लागेल. मग झाकण काढा आणि पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्या.
५. सॉस किंवा चटणीसोबत खा. करायला अगदी सोपे आहे आणि चवीलाही अगदी मस्त.