Join us
Daily Top 2Weekly Top 5

चटपटीत आंबट - गोड - तिखट कैरीची आमटी करा ५ मिनिटांत , कैरी आवडत असेल तर ही रेसिपी चुकवून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 18:14 IST

Make a tangy-sweet-spicy raw mango Amati in 5 minutes. If you like raw mango must try : चविष्ट कैरीची आमटी नक्की करा. खास उन्हाळी पदार्थ.

मार्च आला की आंबा - कैरीची चाहुल लागते. आंब्याचे तर विविध पदार्थ आपण करतोच मात्र कैरीचेही अनेक पदार्थ करता येतात. त्याची आंबट चव अनेकांना आवडते. कैरीच्या अनेक पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीची आमटी. (Make a tangy-sweet-spicy raw mango Amati in 5 minutes. If you like raw mango must try )फारच सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी करायला फारच सोपी आहे. शिवाय नेहमीच्या आमटीपेक्षा चव फारच वेगळी असते. नारळ आणि कैरी एकत्र फारच पारंपरिक चवीचे लागतात. 

साहित्य कैरी, नारळ, कडीपत्ता, हिरवी मिरची, आलं ,लसूण, हळद, तेल, मोहरी, जिरे, लाल तिखट, धणे पूड, गूळ, मीठ, पाणी

कृती१. छान ताजी कैरी घ्यायची. सोलून घ्यायची आणि मग कैरीचे तुकडे करायचे. लांब आणि मध्यम आकाराचे काप करायचे. अगदी थोडी दोन ते तीन चमचे कैरी किसून घ्यायची. 

२. ताजा नारळ फोडायचा. त्याचे तुकडे करायचे सालं काढून घ्यायची. फक्त नारळाचा पांढरा भागच घ्यायचा. मिक्सरमध्ये घ्यायचे. लसणच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्याही मिक्सरच्या भांड्यात घालायच्या. आल्याचा तुकडा घ्यायचा. हिरवी मिरची घ्यायची. त्यात थोडी हळद घालायची चमचाबर लाल तिखट घालायचे आणि थोडी धणे पूडही घालायची. चमचाबर पाणी घालून पेस्ट वाटून घ्यायची. छान एकजीव पेस्ट तयार करायची. 

३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाल्यावर त्यात चमचाबर जिरे घालायचे. तसेच चमचाभर मोहरी घालायची. थोडा कडीपत्ता घालायचा आणि फोडणी मस्त परतून घ्यायची. खमंग परतून झाल्यावर त्यात तयार केलेले वाटण घालायचे. वाटण छान परतायचे. त्याला तेल सुटेपर्यंत परतायचे. 

४. नंतर त्यात किसलेली कैरी घाला तसेच कैरीचे तुकडेही घाला. थोडी हळद घाला आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यात थोडे पाणी घाला आणि झाकण ठेवा. एक वाफ काढून घ्या. कैरी छान शिजू द्या. कैरी शिजली आणि त्याचा अर्क आमटीत उतरला ही त्यात पाणी घाला आणि आमटी पातळ करुन घ्या. नंतर उकळून जरा घट्ट होऊ द्या. गरमागरम भातासोबत खा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Quick & Easy Raw Mango Amti Recipe: Tangy, Sweet, Spicy Delight

Web Summary : Make delicious raw mango amti in minutes! This simple recipe blends tangy raw mangoes with coconut, spices, and jaggery for a unique, flavorful dish. Perfect with rice.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स