लसणाची चटणी ही महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक अतिशय खास आणि आवडता पदार्थ आहे. साध्या जेवणालाही झणझणीत आणि चविष्ट बनवण्याची ताकद या चटणीत असते. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वत्र ही चटणी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. महाराष्ट्रात विशेषतः भाकरी, पिठलं, वरण-भात किंवा झुणका यांसोबत लसणाची चटणी खाण्याची परंपरा आहे. शेतकरी वर्गात तर ही चटणी रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. (Make a spicy red dry garlic chutney in five minutes, it enhances the taste , must try recipe )कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना चव आणि ऊर्जा देणारी अशी ही चटणी आहे. लसणाचा तिखटपणा आणि सुगंध यामुळे जेवणाची चव अधिक वाढते. कोरडी चटणी असो किंवा ओलसर , दोन्ही प्रकार महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. शेंगदाणे, खोबरे किंवा लाल मिरची यांसोबत लसूण वापरून वेगवेगळ्या चवींच्या चटण्या तयार केल्या जातात, त्यामुळे प्रत्येक भागाची चव वेगळी आणि खास वाटते. एकदा अशी सुकी चटणी नक्की करुन पाहा. रेसिपी अगदी सोपी आहे.
साहित्य लसूण, सुकं खोबरं, लाल तिखट, मीठ , तेल, पांढरे तीळ
कृती१. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. जाड लसूण घ्या. म्हणजे पटकन सोलता येते. दोन ते तीन अख्या लसणी घ्यायच्या. जास्त लसूण असेल तर चटणी मस्त होते.
२. एका कढईत तेल घ्यायचे. सुक्या खोबऱ्याचे तुकडे करायचे. पातळ तुकडे करा. तेलावर मस्त परतून घ्यायचे. नंतर त्यात पांढरे तीळ घाला आणि ते परतून घ्या. खमंग परतून घ्यायचे. लसणाच्या काही चार पाकळ्या फक्त परतायच्या. बाकी सगळ्या कच्च्याच घ्यायच्या.
३. मिक्सरच्या भांड्यात लसूण घ्यायची. परतलेली लसूण घ्यायची. तसेच पांढरे तीळ घ्यायचे. सुकं खोबरं घ्यायचं. त्यात लाल तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. लाल तिखट आवडीनुसार घालायचं. मस्त चटणी वाटून घ्यायची. छान खमंग वाटायची. अगदी लगदा करु नका. जरा जाडसरच वाटायची. हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
Web Summary : Maharashtrian garlic chutney is a beloved, spicy condiment. It enhances simple meals with its bold flavor. This dry version, made with garlic, coconut, sesame seeds, and chili powder, is quick to prepare. Grind ingredients coarsely and store airtight.
Web Summary : महाराष्ट्रीयन लहसुन की चटनी एक लोकप्रिय, तीखा व्यंजन है। यह अपने तीखे स्वाद से साधारण भोजन को भी बढ़ा देती है। लहसुन, नारियल, तिल और मिर्च पाउडर से बनी यह सूखी चटनी जल्दी बन जाती है। सामग्री को दरदरा पीसकर एयरटाइट डिब्बे में स्टोर करें।