मऊ, लुसलुशीत चपात्या खायला सर्वांनाच आवडतात. पण चपात्या करण्यासाठी पीठ मळणं, चपात्या लाटणं हे खूपच किचकट काम वाटतं. यात वेळही जातो आणि थकायलाही होतं. चपात्या करण्यासाठी तुम्ही काही युनिक ट्रि्क्स वापरू शकता. ज्यामुळे तुम्हाला चपात्या करण्याचं काम किचकट वाटणार नाही. (Chapati Without Kneading Dough Without Rolling)
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वयंपाकघरातील कामे सोपी आणि जलद व्हावीत असे प्रत्येकाला वाटते. चपाती करणं हे कष्टाचे आणि कौशल्याचे काम मानले जाते, विशेषतः 'लाटणे' ही प्रक्रिया अनेकांना कठीण वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का लाटण्याशिवाय सुद्धा मऊ आणि टम्म फुगलेली चपाती बनवता येते. या पद्धतीला 'लिक्वीड डो चपाती'असेही म्हणतात. (Make A Chapati Without Kneading Dough Without Rolling)
चपात्या करण्याची सोपी स्टेप
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडे मीठ घाला. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ कालवा. लक्षात ठेवा, आपल्याला नेहमीसारखा पिठाचा गोळा मळायचा नाही, तर 'डोसा' किंवा 'धिरड्या'सारखे पातळ मिश्रण तयार करायचे आहे. मिश्रणात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. चमच्याने किंवा विस्करने पीठ व्यवस्थित फेटून घ्या. मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे. गॅसवर नॉन-स्टिक तवा गरम करायला ठेवा. तव्याला थोडे तेल लावून पुसून घ्या. तवा मध्यम गरम झाला की, त्यावर एक मोठा चमचा भरून मिश्रण मध्यभागी टाका आणि डोश्याप्रमाणे हलक्या हाताने गोलाकार पसरवा.
जेव्हा वरची बाजू कोरडी दिसायला लागेल, तेव्हा चपाती उलटून घ्या. दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवर थोडा वेळ भाजू द्या. आता सुती कपड्याने किंवा चमच्याने चपातीच्या कडा हलक्या दाबा. यामुळे वाफेमुळे चपाती छान फुगायला लागेल. दोन्ही बाजूंनी सोनेरी ठिपके येईपर्यंत शेकून घ्या. पीठ मळण्याची आणि लाटण्याची गरज नसल्यामुळे वेळ वाचतो. ज्यांना हाताला त्रास होतो किंवा ज्यांना लाटता येत नाही, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत आहे. या चपात्या अत्यंत मऊ होतात आणि बराच वेळ मऊ राहतात.
Web Summary : Skip kneading and rolling! This unique liquid dough trick makes soft, quick chapatis. Perfect for those short on time or with hand pain. Enjoy fluffy, delicious results every time.
Web Summary : गूंधना और बेलना छोड़ें! यह अनूठी तरल आटा तकनीक नरम, झटपट चपातियाँ बनाती है। समय की कमी या हाथ दर्द वालों के लिए बिल्कुल सही। हर बार फूला हुआ, स्वादिष्ट परिणाम का आनंद लें।