Join us

How to Make Tilache Ladoo : हाताला चटके न बसता वळा तिळाचे लाडू; सोपी रेसिपी, एकही लाडू कडक होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:18 IST

Makar Sankranti Special : हे लाडू करण्यासाठी जास्तवेळ लागत नाही त्यामुळे कोणीही घरच्याघरी हे लाडू बनवू शकते.

मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti Special) सण म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ते म्हणजे तिळाचे लाडू. तिळगूळाचे लाडू  हिवाळ्याच्या दिवसात खाण्याचं खास महत्व आहे.  करायला सोपे आणि खायला खुसखुशित असे तिळाचे लाडू पाहताच तोंडाला पाणी सुटतं. (Cooking Hacks) हे लाडू करण्यासाठी जास्तवेळ लागत नाही त्यामुळे कोणीही घरच्याघरी हे लाडू बनवू शकते. (Tilgul Ladoo) पण कधी हे लाडू चावले जात नाहीत इतके कडक होतात तर कधी जास्तच चिकट होतात. परफेक्ट तिळाचे लाडू बनवण्याची सोपी रेसेपी या  लेखात पाहूया. (Makar Sankranti Special Recipes)

साहित्य

तीळ- २ कप

गूळ - २ कप

काजू - २ टेबल स्पून

बदाम - २ टेबल स्पून

वेलची - ७ ते ९ वाटलेल्या

तूप -  २ लहान चमचे

1) सगळ्यात आधी एक जड तळाचा  तवा घ्या आणि मध्यम आचेवर गरम करा

२) त्यात तीळ घेऊन लालसर होईपर्यंत भाजून घ्या. 

३) तीळ खूप लवकर काळे पडतात त्यामुळे सतत ढवळत राहा काळपट पडणार नाही याची काळजी घ्या.

४) भाजलेले तीळ जाडसर दळून घ्या. दळलेले तीळ आणि  भाजलेले तीळ मिक्स करून घ्या.

५) गूळ तोडून त्याचे लहान लहान तुकडे करा आणि १ चमचा  तूप घालून गरम करा. गुळाचे तुकडे घालून मंद आचेवर गूळ वितळवून घ्या. गूळ वितळल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात काजू बदामाचे काप घाला. 

६) गूळ आणि तिळाचे लाडू बनवण्याचे मिश्रण तयार आहे. एका प्लेटमध्ये पॅनमधून काढा आणि थोडा थंड होऊ द्या. त्यानंतर  छान लाडू वळून घ्या.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स