मकर संक्रांतीच्या दिवशीच्या आधीचा दिवस म्हणजे भाेगी. भोगीच्या दिवशी खिचडी, तीळ लावून केलेल्या भाकरी असे पदार्थ तर केले जातातच. पण या दिवशीची भाजीही खूप खास असते. आपली पारंपरिक मिक्स व्हेज असं तिला म्हटलं तरी चालेल. कारण या दिवसांत मिळणाऱ्या सगळ्या ताज्या ताज्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते. त्यामुळे ती खूप चवदार तर होतेच, पण शिवाय खूप पौष्टिकही असते (how to make sankranti bhogi special bhaji?). आता भाजीची पौष्टिकता आणि चव जपत अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची ते पाहूया..(Makar Sankranti 2026 special bhogichi bhaji recipe)
संक्रांत स्पेशल भोगीची भाजी करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी मटार, पाव वाटी कोवळे हरबरे
पाव वाटी ताजी तूर, पाव वाटी वालाच्या शेंगा
अर्धी वाटी गाजराचे तुकडे आणि ५ ते ६ बोरं
फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी
एक वांगं, बटाटा, आणि टोमॅटो
२ चमचे तीळ आणि २ चमचे शेंगदाणे
धने आणि जीरे पूड आणि चवीनुसार तिखट मीठ
२ ते ३ हिरव्या मिरच्या आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती
गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तीळ, शेंगदाणे घालून थोडेसे भाजून घ्या. यानंतर हिरव्या मिरच्या घालून त्या ही भाजून घ्या. आता हे पदार्थ थंड होऊ द्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. टोमॅटोची प्युरीही करून घ्या.
तिळगुळाच्या पोळ्या लाटताना फुटतात, चवदार होत नाहीत? घ्या खमंग खुसखुशीत पोळीची सोपी रेसिपी
यानंतर कढईमध्ये तेल घालून फोडणी करून घ्या. त्यामध्ये वाटाणे, तुरीचे दाणे, बटाटा, गाजराचे तुकडे, बोरं, वालाच्या शेंगा असं सगळं परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे आणि तिळाचं वाटण घालून परतून घ्यावे. यानंतर सगळ्यात शेवटी टोमॅटोची प्युरी, चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरमागरम, चवदार भोगीची भाजी तयार..
Web Summary : Make traditional Bhogi bhaji easily with fresh winter vegetables! Roast sesame seeds and peanuts, then sauté the veggies. Add tomato puree and spices, cover, and steam. Enjoy a delicious, nutritious dish for Makar Sankranti.
Web Summary : ताज़ी सर्दियों की सब्जियों के साथ आसानी से पारंपरिक भोगी भाजी बनाएं! तिल और मूंगफली भूनें, फिर सब्जियों को भूनें। टमाटर प्यूरी और मसाले डालें, ढककर भाप दें। मकर संक्रांति के लिए एक स्वादिष्ट, पौष्टिक व्यंजन का आनंद लें।