संक्रांतीचा सण आता अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे घराेघरी संक्रांतीची तयारी सुरू झाली आहे (Makar Sankranti 2026). आता संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या पोळीचा विशेष मान असतो. त्यादिवशी बहुतांश घरांमध्ये नैवेद्यासाठी पुरणपोळीऐवजी तिळगुळाची पोळी केली जाते. आता वर्षातून एकदाच तिळगुळाची पोळी केली जाते. त्यामुळे बऱ्याच जणींना ती व्यवस्थित जमत नाही. पोळी लाटताना मध्येच फुटते आणि मग सगळं सारण बाहेर येतं. किंवा काही जणींना तिळगुळाचं योग्य प्रमाण माहिती नसल्याने पोळी म्हणावी तशी चवदार होत नाही. असं काही तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून तिळगुळाच्या पोळीची ही रेसिपी पाहून घ्या..(Makar Sankranti special til gul poli recipe)
संक्रांत स्पेशल तिळगुळाच्या पोळीची रेसिपी
साहित्य
१ वाटी तीळ
१ टीस्पून खसखस
पाव वाटी खोबऱ्याचा किस
जेवणानंतर तुम्हीही बडिशेप किंवा खडीसाखर खाता? बघा या दोन्हींचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो
पाव वाटी बेसन आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट
१ वाटी गूळ आणि २ गरजेनुसार कणिक
१ टीस्पून जायफळ आणि तेवढीच वेलची पूड
कृती
तिळगुळाच्या पोळ्या करण्यासाठी तीळ खमंग भाजून घ्या. त्यानंतर खसखस आणि खोबऱ्याचा किस वेगवेगळा करून भाजा. त्यानंतर कढईत तेल घालून त्यात बेसन घालून चांगलं परतून घ्या.
यानंतर परतून घेतलेले बेसन पीठ, भाजलेले तीळ, खसखस, खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कुट, जायफळ पावडर, वेलची पावडर घाला आणि हे पदार्थ मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये गूळ घालून सगळे पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या.
फिट राहण्यासाठी प्रिया बापटचा साधा- सोपा मंत्र, सांगितल्या प्रत्येकीला सहज जमतील अशा ५ गोष्टी
यानंतर कणिक भिजवून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यात थोडा मैदाही घालू शकता. त्यामध्ये मीठ आणि थोडं गरम तेल घालून कणिक मळून घ्या. ती १५ मिनिटे झाकून ठेवा आणि नंतर पुरणपोळी लाटतो त्याप्रमाणे तिळगुळाचं सारण भरून पोळ्या करा. तूप घालून तव्यावर खमंग भाजून घ्या. अशी खमंग, खुसखुशीत पोळी सगळ्यांनाच आवडेल.
