महाशिवरात्र आता अवघ्या २ ते ३ दिवसांवर आली आहे. त्यामुळे घरोघरी उपवासाच्या वेगवेगळ्या पदार्थांची तयारी सुरू झालेली दिसते. कारण जे काही उपवास सगळे कुटूंब मिळूनच करते अशा उपवासांपैकी एक आहे महाशिवरात्रीचा उपवास. आता घरातल्या सगळ्यांनाच उपवास असला की आपोआपच काहीतरी खमंग, चवदार पदार्थ आवर्जून केले जातात. आणि अशा पदार्थांपैकी एक आहे साबुदाणा वडे. साबुदाणा वडे जवळपास सगळ्यांनाच खूप आवडतात. पण ते तेलकट होतात म्हणून अनेकजण ते खाणं टाळतात. म्हणूनच आता पुढे सांगितलेल्या काही टिप्स बघून साबुदाणा वडे करून पाहा. यामुळे वडे अजिबात तेलकट होणार नाहीत (how to make sabudana vada less oily?). उलट एवढे खुसखुशीत होतील की सगळेजण आवडीने खातील.(cooking tips for making sabudana vada crispy and crunchy)
साबुदाणे वडे कमी तेलकट व्हावेत यासाठी टिप्स
१. साबुदाणा भिजवताना त्यात खूप पाणी घालून तो अगदी गचका करू नका. कारण जास्त पाण्यामुळे तो जर चिकट, गचका झाला तर वड्यांना जास्त तेल लागतं. त्यामुळे साबुदाणा भिजवताना नेहमी बेताचंच पाणी घाला.
केसांत माळण्यासाठी गजऱ्याचे ६ सुंदर नवे प्रकार, तुमच्या साडीनुसार निवडा गजरा, लाखांत एक दिसाल
२. साबुदाण्यामधलं बटाट्याचं प्रमाणही योग्य असावं. कारण बटाटा जर गरजेपेक्षा जास्त झाला तर साबुदाणे वडे खूप मऊ पडतात आणि शिवाय त्यांच्यामध्ये तेलही खूप असतं. त्यामुळे साधारण १ वाटी साबुदाणा घेणार असाल तर त्याला १ मध्यम आकाराचा बटाटा पुरेसा आहे.
३. वड्यांसाठी पीठ मळत असताना ते खूप पातळ भिजवू नका. कारण पीठ जेवढं जास्त सैलसर असतं तेवढे वडे अधिक तेलकट होतात. त्यामुळे वड्यांचं पीठ नेहमी घट्ट असावं. त्यामुळे वडेही मऊ पडत नाही. छान कुरकुरीत होतात.
४. वडे तळण्यापुर्वी गरम झालेल्या तेलामध्ये थोडं मीठ घालावं. मीठ घातल्यामुळे वडे कमी तेल पितात. शिवाय वडे तळून झाल्यानंतर ते एखादा मिनिट टिश्यू पेपरवर ठेवून नंतर चाळणीमध्ये ठेवावे. त्यामुळे त्यांच्यामधलं जास्तीचं तेलही शोषलं जातं आणि ते मऊही पडत नाहीत.
Web Summary : Make perfect Sabudana Vadas this Mahashivratri! Follow these tips to avoid oily, soft vadas. Control water, potato, and batter consistency. Add salt to the oil for crispy results.
Web Summary : इस महाशिवरात्रि पर बनाएं एकदम सही साबूदाना वड़ा! तैलीय, नरम वड़ा से बचने के लिए इन युक्तियों का पालन करें। पानी, आलू और घोल की स्थिरता को नियंत्रित करें। कुरकुरे परिणाम के लिए तेल में नमक डालें।