Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Mahashivrata 2026 Special - उपासाचा साबुदाणा डोसा- इतका कुरकुरीत आणि पचायला हलका की पित्त होणारच नाही

Mahashivrata 2026 Special - उपासाचा साबुदाणा डोसा- इतका कुरकुरीत आणि पचायला हलका की पित्त होणारच नाही

Mahashivrata 2026 Special - Fasting Sabudana Dosa - So crispy and easy to digest : नक्की करा साबुदाणा डोसा. सोपा आणि चविष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 13:00 IST2026-02-11T18:56:31+5:302026-02-13T13:00:04+5:30

Mahashivrata 2026 Special - Fasting Sabudana Dosa - So crispy and easy to digest : नक्की करा साबुदाणा डोसा. सोपा आणि चविष्ट.

Mahashivrata 2026 Special - Fasting Sabudana Dosa - So crispy and easy to digest | Mahashivrata 2026 Special - उपासाचा साबुदाणा डोसा- इतका कुरकुरीत आणि पचायला हलका की पित्त होणारच नाही

Mahashivrata 2026 Special - उपासाचा साबुदाणा डोसा- इतका कुरकुरीत आणि पचायला हलका की पित्त होणारच नाही

महाशिवरात्रीचा उपवास म्हटला की घराघरात विविध पदार्थ केले जातात. उपासाच्या दिवशी जिभेचे चोचले कमी नाही तर जास्तच पुरवले जातात. उपासाचे पदार्थ खरं तर मस्त चविष्टच असतात. त्यामुळे नक्की करायला हवेत. जे उपास करत नाहीत ते ही आवडीने खातात. उपासाच्या दिवशी साबुदाण्याला मागणी फार असते.  साबुदाणा खिचडी, वडा, थालीपीठ असे पारंपरिक पदार्थ हमखास केले जातात. वर्षानुवर्षे तेच ते पदार्थ खाल्ले जात असल्यामुळे कधी कधी काहीतरी वेगळं, पण उपासाला चालेल असं खावंसं वाटतं. अशा वेळी मस्त, चविष्ट साबुदाणा डोसा हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

साबुदाणा उपवासात ऊर्जा देणारा पदार्थ मानला जातो. त्यापासून तयार होणारा डोसा बाहेरुन हलका कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतो. हा पदार्थ चवीला जेवढा मस्त तेवढाच करायला सोपाही आहे.  खिचडी किंवा वड्यांपेक्षा हा पर्याय थोडा हटके ठरतो. त्यामुळे या वेळी काहीतरी वेगळे ट्राय करुन पाहा. तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य 
साबुदाणा, हिरवी मिरची, तूप, जिरे, पाणी, मीठ, बटाटा

कृती
१. बटाटा छान उकडून घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आणि गार करायचा. एका मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा उकडलेल्या बटाट्याचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात चवीनुसार मीठ घालायचे. जिरे घालायचे. पाणी घालायचे. आणि पेस्ट वाटून घ्यायची. सगळे पदार्थ छान एकजीव वाटायचे. जास्त घट्ट नको आणि पातळही, मध्यम प्रमाणाचे पीठ तयार करायचे. 

२. मिश्रणात चवीनुसार मीठ घालायचे. छान ढवळून घ्यायचे, तवा गरम करायचा, त्याला तेल लावायचे. तयार मिश्रण त्यावर लावायचे दोन्ही बाजूंनी मस्त खमंग परतून घ्यायचे. अगदी काही मिनिटांत होणारी रेसिपी आहे. 

 

Web Title : महाशिवरात्रि स्पेशल: कुरकुरा साबूदाना डोसा – एक स्वस्थ व्रत रेसिपी

Web Summary : इस महाशिवरात्रि, स्वादिष्ट और स्वस्थ साबूदाना डोसा आजमाएं। यह पारंपरिक व्रत व्यंजनों का एक शानदार विकल्प है। साबूदाना, आलू और मसालों से बनाना आसान है, जो व्रत के लिए एकदम सही कुरकुरा और हल्का भोजन है।

Web Title : Mahashivratri Special: Crispy Sabudana Dosa – A Healthy Fasting Recipe

Web Summary : This Mahashivratri, try a delicious and healthy Sabudana Dosa. A great alternative to traditional fasting dishes. It's easy to make with sago, potatoes, and spices, offering a crispy and light meal perfect for fasting.