Join us

तोंडी लावण्यासाठी करा गावरान कोल्हापूरी मिरची ठेचा; झणझणीत, अस्सल चवीची रेसेपी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 15:03 IST

Maharashtrian Green Chilli Thecha Recipe : कोल्हापूरी मिरचीचा ठेचा करण्याची सोपी पद्धत पाहूया. हा ठेचा करण्यासाठी तुम्हाला बाजारातून जास्त सामान आणावं लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या २ ते ३ वस्तू वापरून तुम्ही हा ठेचा बनवू शकता.

जेवताना ताटात  मिरची लागतेच असे बरेचजण असतात. (Cooking Hacks) डाळ भात किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी मिरचीची ठेचा असेल तर  जेवणाची मजाच काही वेगळी.  मिरीचा ठेचा बनवण्याच्या अनेक पारंपरिक पद्धती आहेत. साध्या जेवणाची चव वाढवण्याचं काम ठेचा करतो. (How to make mirchi thecha) कोल्हापूरी मिरचीचा ठेचा करण्याची सोपी पद्धत पाहूया. हा ठेचा करण्यासाठी तुम्हाला बाजारातून जास्त सामान आणावं लागणार नाही. घरात उपलब्ध असलेल्या २ ते ३ वस्तू वापरून तुम्ही हा ठेचा बनवू शकता. (Green chilli thecha recipe)

साहित्य

१२ ते १५ मिरच्या

एक कप शेंगदाणे

अर्धा कप लसुण

२ टेबलस्पून जीरं

2 टेबलस्पून तेल

1 टीस्पून मीठ

कृती

१) मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या धुवून देठ काढून घ्या मग मिरचीचे तुकडे करा

२)  तेल तापवल्यानंतर त्यात शेंगदाणे घाला. शेंगदाणे छान परतून घेतले की त्यात जिरं घाला. नंतर लसूण पाकळ्या घाला. मिरचीचे तुकडे घाला साधारण ५ मिनिटं परतून घेऊन गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करायला ठेवा.

३) या मिश्रणत मीठ घालून खलबत्त्यात ठेचून घ्या. किंवा तुम्ही मिक्सरमध्येही हे मिश्रण वाटून घेऊ शकता. 

४) कढईत तेल तापल्यानंतर त्यात ठेचा ३/४ मिनिटं परतवून घ्या.

५) तयार आहे झणझणीत कोल्हापुरी मिरचीचा ठेचा. भाकरी, चपाती बरोबर खाण्यासाठी हा ठेचा उत्तम पर्याय आहे. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स