Join us

Maharashtrian chutney recipes : अस्सल महाराष्ट्रीय चवीच्या ४ चटण्या, जेवणाची रंगत वाढते आणि तोंडाला येते चव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2025 18:41 IST

Maharashtrian chutney recipes: 4 chutneys with authentic Maharashtrian flavor, enhance the food , easy and tasty food : ताटात चटणी तर असायलाच हवी. एकाच प्रकारची नको करा विविध चवीच्या चटणी. पाहा सोप्या रेसिपी.

भारतीय पद्धतीत ताटात फक्त दोन तीन पदार्थ नसतात, आपल्याकडे जेवण साग्रसंगीत असते. विविध प्रकारच्या चवींचा समावेश असतो. भाजी, पोळी, भात, आमटी हे पदार्थ म्हणजे मुख्य अन्न असतात. (Maharashtrian chutney recipes: 4 chutneys with authentic Maharashtrian flavor, enhance the food , easy and tasty food )मात्र फक्त मुख्य अन्नच नाही तर ताटाच्या दुसर्‍या बाजूला असणारे पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात. लोणचे, पापड, एखादा गोड पदार्थ, दही, ताक, कुरडई आणि मुख्य म्हणजे चटणी. विविध प्रकारच्या चटण्या आपण तयार करतो. मस्त चविष्ट असे विविध प्रकार चटणीत असतात. सुकी चटणी तर असतेच, मात्र वाटणाची ताजी चटणी पानात असली की जेवणाची मज्जाच वाढते. 

कधी नाश्त्याला डोसा, इडली, थालीपीठ, पराठा असे पदार्थ केल्यावर त्यासोबत आपण ओली चटणी करतो. हिरवी चटणी घरोघरी केली जाते. मात्र त्यातही काही प्रकार असतात. पाहा आणखी कोणत्या प्रकारे चटणी करता येते. 

१.  हिरवी चटणी ही चटणी करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, आल्याचा तुकडा, पुदिन्याची ताजी पाने, चमचाभर दही, चवी पुरते मीठ आणि जिरे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि चटणी वाटायची. 

२. कांदा टोमॅटो चटणीएका कढईत तेल घ्यायचे. त्यात टोमॅटोचे तुकडे घालायचे तसेच कांद्याचे काही तुकडे घालायचे. लाल मिरची घालायची. लसणाचे तुकडे घालायचे. आल्याचा तुकडा घालायचा. छान परतायचे आणि मग गार करुन वाटून घ्यायचे. वरतून मोहरीची फोडणी द्यायची. पराठा , डोसा अशा पदार्थांशी ही चटणी एकदम मस्त लागते. 

३. शेंगदाणे आणि डाळ्याची चटणीमिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घ्यायचे. त्यात कोथिंबीर घालायची. डाळं घालायचं. हिरवी मिरची घालायची. लसणाच्या पाकळ्या, जिरे, मीठ, दही थोडे भिजवलेले पोहे घालायचे ताजा नारळ घालायचा आणि वाटायचे. वरतून मोहरीची फोडणी द्यायची.

४. नारळ दह्याची चटणी नारळ, कोथिंबीर, हिरवी मिरची, दही, लसूण, मीठ एवढेच पदार्थ वाटायचे. वरतून हळद, लाल तिखट, मोहरी , कडीपत्ता अशी फोडणी द्यायची. सोपी साधी चटणी मस्त लागते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स