Join us

Maharashtrian Baingan Bharta: अस्सल मराठी चवीचं चमचमीत भरीत करण्याच्या ३ पद्धती, पाहा ३ प्रकारचे भरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 14:41 IST

Maharashtrian Baingan Bharta: 3 ways to make authentic Marathi flavoured bharit, see 3 recipes : वांग्याचे भरीत करायच्या सोप्या आणि चमचमीत पद्धती. पाहा टिप्स आणि करा गरमागरम भरीत.

भरीताची वांगी बाजारात दिसली की ती विकत घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही. गरमागरम वांग्याचं भरीत आणि भाकरी खायची मज्जा काही वेगळीच असते. (Maharashtrian baingan bharta: 3 ways to make authentic Marathi flavoured bharit, see 3 recipes )भरीत चवीला जेवढे भारी तेवढेच करायला सोपे. वांग्याचे भरीत म्हणजे महाराष्ट्रातील घरोघरी केला जाणारा पदार्थ. मात्र करायची पद्धत जरा वेगवेगळीच असते. भरीत करायच्या काही पद्धती आणि भरीत एकदम परफेक्ट कसं करायचं यासाठी टिप्स पाहा. 

 वांग्याचे भरीत करताना वांगी मस्त भाजणे फार महत्त्वाचे असते. थेट गॅसवरच ठेवायचे आणि भाजायचे. चुलीवर किंवा कोळश्यावर भाजलेले वांगं जास्त चविष्ट होते मात्र त्याची सोय नसेल तर गॅवर भाजणेही उत्तमच. भरतासाठी जास्त बिया असलेले वांगं घ्यायचे. आकाराला जरा मोठे असलेले खालून गोलाकार असलेले वांगं बियांनी भरलेले असते. तसेच वांगं निवडा. वांगं भाजताना त्याला थोडे तेल लावले तर लवकर भाजले जाते. भाजल्यावर थोडा वेळ झाकून ठेवल्यावर त्याची साले पटकन निघतात. तसेच वांग्यांवर थोडे गार पाणी ओतले की साले काढणे एकदम सोपे होते. 

भरीत करताना कुसकरलेली वांगी फोडणीत घातल्यावर परतायची. परतल्यावर भाजी एकदम कोरडी होते. भांड्याला चिकटते. त्यात अगदी दोन चमचे मीठाचे पाणी घालायचे. त्यामुळे भरीत एकजीव होते आणि मसालेही मिसळून येतात. 

१. वांगं भाजून झाल्यावर त्यात कच्चा कांदा आणि लसूण-मिरचीची पेस्ट घालून ते कालवले जाते. त्याला वरतून थोडे कच्चे तेल लावायचे आणि मीठ घालायचे. परतलेले शेंगदाणे घालायचे हाताने कालवून खायला घ्यायचे. अनेक जण असे कच्चे भरीत करतात. 

२. ताकातले भरीत करायची पद्धतही आहे. त्यासाठी भरीत करताना त्यात थोडे ताक घातले जाते. त्यामुळे भरीताला आंबटसर चव येते. त्याला कोशिंबीरीचे वाटण लावायचे. 

३. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसुणही वांग्यांसारखी भाजून घ्यायची. नंतर त्याची साले काढून फोडणी तयार करायची आणि ती फोडणी भाज्यांवर ओतायची. हाताने त्याचा लगदा करायचा. या पद्धतीचे भरीतही केले जाते. त्यात शेंगदाणे परतून घालायचे.   

टॅग्स :पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न