Join us

Maharashtra Monsoon food : नारळ- चिंच घालून करा अस्सल पारंपरिक चवीची स्वादिष्ट गोळ्यांची आमटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 17:53 IST

Maharashtra Monsoon food: Make delicious traditional flavoured amti with coconut and tamarind, easy and tasty recipes : ही अशी आमटी एकदा नक्की खाऊन पाहा. चवीला मस्त करायला सोपी आणि चव जरा वेगळीच आहे.

भात आणि वरण हा भारताच्या घरोघरी केला जाणारा जेवणाचा बेत आहे. विविध प्रकारच्या आमटी , वरण, डाळ केल्या जातात. चवीला सगळ्याच मस्त. (Maharashtra Monsoon food: Make delicious traditional flavoured amti with coconut and tamarind, easy and tasty recipes)एकदा ही अशी गोळे घातलेली आमटी नक्की करुन पाहा. अगदी सोपी आहे मात्र एकदम मस्त लागते. 

आमटीसाठी सामग्री ओला नारळ, तांदूळ, धणे, हळद, लाल तिखट, चिंच, पाणी, हिंग, जिरे

गोळे करण्यासाठी सामग्रीबेसन, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, पाणी  

कृती१. ताजा नारळ फोडायचा आणि मस्त खवायचा. खवलेला वाटीभर नारळ मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा. चिंच कोमट पाण्यात भिजवायची आणि तिचा अर्क काढून घ्यायचा. त्यातील बिया काढायच्या आणि फक्त अर्क घ्यायचा. तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा. तसेच दोन चमचे धणे घ्यायचे आणि चमचाभर लाल तिखट घालायचे. तांदूळ भिजवायचे आणि अगदीदोन चमचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालायचे. 

२.कांद्याची साले काढून कांदा मस्त बारीक चिरुन घ्यायचा. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. तसेच कोथिंबीर बारीक चिरायची. सगळे पदार्थ एका परातीत घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि त्यात बेसनाचे पीठ घालायचे. हळद आणि मीठ घालून कालवायचे आणि मग पाणी घालायचे. सगळे पदार्थ मिक्स करायचे. भजीसाठी जसे पीठ तयार करता तसेच पीठ तयार करायचे. जास्त पातळ करु नका.

३. कढईत तेल घ्यायचे. तेल जरा गरम झाले की त्यात जिरे घालायचे आणि जिरे तडतडू द्यायचे. जिरे तडतडल्यावर त्यात हिंग घालायचे. नंतर तयार केलेली नारळाची पेस्ट घालायची. ती पेस्ट मस्त शिजवायची आणि नंतर त्यात थोडे पाणी घालून उकळायचे. उकळून झाल्यावर त्यात तयार केलेल्या बेसनाच्या पीठाचे गोळे सोडायचे. झाकून ठेवायचे आणि मग गोळे शिजू द्यायचे. चवी नुसार मीठ घालायचे. गोळे सोडल्यावर लगेच ढवळायचे नाही. 

४. झाकून ठेवायचे. गोळ्यांना जरा आकार प्राप्त झाल्यावर ते फुटणार नाहीत. मग आमटी ढवळायची. चवीला एकदम मस्त लागते. गरमागरम भातासोबत गोळ्यांची आमटी खायची.     

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स