Lokmat Sakhi >Food > maharashtra monsoon food : शेंगदाण्याचं झिरकं कधी खाल्लं आहे, झणझणीत-चमचमीत शेंगदाण्याची भाजीच..

maharashtra monsoon food : शेंगदाण्याचं झिरकं कधी खाल्लं आहे, झणझणीत-चमचमीत शेंगदाण्याची भाजीच..

Maharashtra monsoon food: Have you ever eaten peanut curry? a spicy and crunchy peanut dish : भाजी करायचा कंटाळा आला असेल तर झटपट करा हा पदार्थ. दाण्यांची भाजी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 14:13 IST2025-07-17T14:12:57+5:302025-07-17T14:13:58+5:30

Maharashtra monsoon food: Have you ever eaten peanut curry? a spicy and crunchy peanut dish : भाजी करायचा कंटाळा आला असेल तर झटपट करा हा पदार्थ. दाण्यांची भाजी.

Maharashtra monsoon food: Have you ever eaten peanut curry? a spicy and crunchy peanut dish | maharashtra monsoon food : शेंगदाण्याचं झिरकं कधी खाल्लं आहे, झणझणीत-चमचमीत शेंगदाण्याची भाजीच..

maharashtra monsoon food : शेंगदाण्याचं झिरकं कधी खाल्लं आहे, झणझणीत-चमचमीत शेंगदाण्याची भाजीच..

रोज काय भाजी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. एखाद्या दिवशी भाजी नकोच वाटत असेल तर या पद्धतीने शेंगदाण्यांचा हा पदार्थ करुन पाहा. (Maharashtra monsoon food: Have you ever eaten peanut curry? a spicy and crunchy peanut dish)भाजीची कमतरता जाणवणारही नाही आणि चवीला एकदम भारी आहे. घरात कोणतीच भाजी नसेल तर प्रत्येक वेळी बटाटा नको एकदा हा पदार्थ करुन पाहा. 

साहित्य
शेंगदाणे, कांदा, कोथिंबीर, तेल, लसूण, कडीपत्ता, लाल तिखट, पाणी, जिरं, मीठ, हळद, हिंग 

कृती
१.  शेंगदाणे भाजून घ्यायचे. दाण्याचे कुट घरात असले तरी ते न वापरता जाडसर असे कुट तयार करुन घ्यायचे. म्हणजे भाजीला घट्टपणा छान येईल आणि खाताना दाणेही लागतील. शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याची सालं हाताने चोळून काढून टाका. थोडी राहिली तरी काही हरकत नाही. शेंगदाणे जाडसर वाटून घ्यायचे. सरसरीत कुट करायचे नाही. जाडसर वाटून घ्यायचा. कोथिंबीर बारीक चिरुन घ्यायची. कांदा सोलायचा आणि बारीक चिरायचा. लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या लसूण ठेचून घ्यायचा. 

२.  कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापल्यावर त्यात चमचाभर जिरं घाला आणि परतून घ्यायचे. जिरं मस्त फुलेल मग त्यात हिंग घाला. हिंग घालायला विसरायचे नाही. शेंगदाणे उष्ण असतात त्याचा त्रास होऊ नये यासाठी हिंग उपयुक्त ठरेल. त्यात कडीपत्याची पाने घालायची आणि परतून घ्यायची. नंतर ठेचलेला लसूण घालायचा मस्त खमंग परतायचा. लसूण परतून झाल्यावर त्यात चमचाभर हळद घालायची. तसेच चमचाभर लाल तिखट घालायचे. चवी पुरते मीठ घाला आणि मग शेंगदाण्याचे वाटण घालायचे. शेंगदाण्याचे कुट छान परतून घ्यायचे. सगळे मसाले छान शिजले की त्यात पाणी घाला.

३. पाणी जास्त घालू नका. भाजी पातळच करायची आहे मात्र अगदी आमटी एवढी पातळ नाही. त्यामुळे पाणी जरा बेतानेच घालायचे. पाणी घातल्यावर एक वाफ काढून घ्यायची. सगळे पदार्थ छान शिजल्यावर जरा घट्ट होऊ द्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मस्त ढवळायचे आणि गरमागरम भाजी खायची. पोळी, भाकरी अगदी भातासोबतही मस्त लागते.   

Web Title: Maharashtra monsoon food: Have you ever eaten peanut curry? a spicy and crunchy peanut dish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.