Lokmat Sakhi >Food > Maharashtra Food : लाल भोपळ्याचं भरीत, झटपट पौष्टिक पदार्थ-पावसाळ्यात पचालयलाही हलकं आणि चवीलाही मस्त

Maharashtra Food : लाल भोपळ्याचं भरीत, झटपट पौष्टिक पदार्थ-पावसाळ्यात पचालयलाही हलकं आणि चवीलाही मस्त

Maharashtra Food: Red pumpkin Raita, a quick and nutritious dish, easy to digest and delicious to taste, rainy season food : लाल भोपळ्याचे असे भरीत कधी खाल्ले आहे का? पाहा सोपी रेसिपी. भाजीऐवजी करा भरीत. दह्याची चव एकदम मस्त.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 17:24 IST2025-07-21T17:23:13+5:302025-07-21T17:24:47+5:30

Maharashtra Food: Red pumpkin Raita, a quick and nutritious dish, easy to digest and delicious to taste, rainy season food : लाल भोपळ्याचे असे भरीत कधी खाल्ले आहे का? पाहा सोपी रेसिपी. भाजीऐवजी करा भरीत. दह्याची चव एकदम मस्त.

Maharashtra Food: Red pumpkin Raita, a quick and nutritious dish, easy to digest and delicious to taste, rainy season food | Maharashtra Food : लाल भोपळ्याचं भरीत, झटपट पौष्टिक पदार्थ-पावसाळ्यात पचालयलाही हलकं आणि चवीलाही मस्त

Maharashtra Food : लाल भोपळ्याचं भरीत, झटपट पौष्टिक पदार्थ-पावसाळ्यात पचालयलाही हलकं आणि चवीलाही मस्त

एखादा दिवस भाजी करायचा कंटाळा येतो. काहीतरी वेगळी चव खावीशी वाटते. लाल भोपळ्याची भाजी चवीला छान लागते. (Maharashtra Food: Red pumpkin Raita, a quick and nutritious dish, easy to digest and delicious to taste, rainy season food)मात्र नेहमी भाजीच करायला हवी असं काही नाही कधीतरी वेगळे पदार्थ नक्की करुन पाहावेत. भोपळ्याचं भरीत वर्षानुवर्षे केले जात आहे. एकदम सोपी साधी रेसिपी आहे. मात्र चवीला फारच मस्त लागते. अनेक गावांमध्ये उत्सवांमध्ये हे भरीत केले जाते. पंगतीत या भरीताला फार मागणी असते. जर कधी खाल्ले नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की खाऊन पाहा.   

अगदी फक्त दही भोपळा आणि मीठ असेल तरी हे भरीत एकदम चविष्ट लागते. तसेच लाल तिखट घालू शकता. मोहरीची फोडणीही देऊ शकता. सामग्री जशी उपलब्ध आहे त्यानुसार करता येणारी रेसिपी आहे. 

साहित्य
लाल भोपळा, दही, हिरवी मिरची, तूप, जिरे, मीठ, दाण्याचे कुट, साखर, कडीपत्ता, हळद  

कृती
१. लाल भोपळ्याची साल काढून घ्यायची. भोपळा मीठाच्या पाण्यात स्वच्छ धुवायचा. त्याचे लहान तुकडे करायचे. भोपळा कुकरमध्ये शिजवून घ्यायचा. किंवा पातेल्यात पाणी घेऊन त्यात उकळवायचा. भोपळा शिजायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे पाण्यात शिजवण्यापेक्षा कुकरला लावणे जास्त फायद्याचे ठरते. 

२. शेंगदाण्याचे कुट नसेल तर शेंगदाणे भाजायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. नंतर शेंगदाणे मिक्सरमधून फिरवायचे आणि त्याचे कुट तयार करायचे. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. 

३. भोपळा शिजल्यावर कुसकरुन घ्यायचा. मस्त मऊ करुन घ्यायचा. मग त्यात चमचाभर साखर घालायची. तसेच चवी पुरते मीठ घालायचे. त्यात छान गोड दही घालायचे. दाण्याचे कुट घालायचे. ढवळून घ्यायचे आणि दही व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे. 

४. एका फोडणी पात्रात थोडे तूप घ्यायचे. तूप जरा गरम करायचे आणि त्यात जिरे घालायचे. जिरे तडतडल्यार कडीपत्ता घालायचा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. छान परतून घ्यायचे. सगळे पदार्थ व्यवस्थित परतल्यावर गॅस बंद करायचा आणि त्यात हळद घालायची. तयार फोडणी भोपळ्यावर ओतायची आणि ढवळून घ्यायचे. सगळे पदार्थ छान एकजीव झाल्यावर मस्त भरीताचा आस्वाद घ्यायचा. 

Web Title: Maharashtra Food: Red pumpkin Raita, a quick and nutritious dish, easy to digest and delicious to taste, rainy season food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.