साहित्य
बेसन, तेल, मोहरी, कडीपत्ता, कोथिंबीर, जिरे, हिंग, हिरवी मिरची, कांदा, हळद, पाणी, लसूण, मीठ, आलं
कृती
१. झुणका आणि पिठलं फार वेगळं नाही हे जरी खरं असलं तरी चव फार वेगळी लागते. (Maharashtra food: Make spicy jhunka, monsoon food recipes, easy and quick recipe) कोरडा किंवा सुका झुणका चवीला फार छान असतो. तो करताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवा जसं की बेसन पहिले परतायचे मगच फोडणीत टाकायचे. म्हणजे ते कच्चे राहत नाही आणि पोटाला बाधत नाही. बेसन पाच ते दहा मिनिटांसाठी मस्त परतायचे. चमचाभर तेलावर परता.
२. कांदा सोलायचा आणि छान बारीक चिरुन घ्यायचा. कांदा चिरुन झाल्यावर हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण मस्त ठेचायचा आणि आलं किसून घ्यायचं. अगदी थोडंच आलं घ्यायचं. कोथिंबीर निवडायची आणि बारीक चिरायची.
३. एका कढईत किंवा पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं. तेल जरा गरम करायचे आणि मग त्यात जिरे घालायचे आणि परतायचे. तसेच मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यात कडीपत्त्याची पाने घालायची. कडीपत्ता छान परतायचा. त्यानंतर त्यात हिंग घालायचे. ठेचलेली लसूण घालून परतायचे. किसलेले आले घाला आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घाला. मस्त खमंग परता. बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि गुलाबी होईपर्यंत मंद आचेवर परतायचा. सगळे पदार्थ शिजल्यावर त्यात हळद घालायची. मीठ घालायचे आणि ढवळायचे.
४. सगळं छान परता आणि मग त्यात परतलेले बेसन घाला. परतलेले असल्यामुळे बेसन पुन्हा जास्त वेळ परतावे लागत नाही. बेसन आणि इतर पदार्थ छान एकजीव करायचे आणि मग त्यावर हाताने पाणी शिंपडायचे. जास्त नाही पण जरा सगळीकडे लागेल एवढे पाणी घ्यायचे. जरा ढवळायचे आणि परतून घ्यायचे. पाण्यामुळे बेसनाचे लहान गोळे होतील. ते पातळ होणार नाही गोळे होतील एवढेच पाणी घालायचे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त परतायचे.