lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > महाशिवरात्र विशेष : वरून कुरकुरीत आतून-मऊ साबुदाणा वड्यांची सोपी रेसिपी; जराही तेल पिणार नाहीत वडे

महाशिवरात्र विशेष : वरून कुरकुरीत आतून-मऊ साबुदाणा वड्यांची सोपी रेसिपी; जराही तेल पिणार नाहीत वडे

Maha Shivratri Special : साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ वेळा साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 03:30 PM2024-03-07T15:30:38+5:302024-03-07T15:36:02+5:30

Maha Shivratri Special : साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ वेळा साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्या.

Maha Shivratri Special : How to Make Sabudana Vada Sabudana Vada Recipe | महाशिवरात्र विशेष : वरून कुरकुरीत आतून-मऊ साबुदाणा वड्यांची सोपी रेसिपी; जराही तेल पिणार नाहीत वडे

महाशिवरात्र विशेष : वरून कुरकुरीत आतून-मऊ साबुदाणा वड्यांची सोपी रेसिपी; जराही तेल पिणार नाहीत वडे

महाशिवरात्रीच्या (Maha Shivratri 2024) दिवशी अनेकजण उपवास करतात उपवासाच्या दिवशी नेहमी नेहमी साबुदाण्याची खिचडी खाण्यापेक्षा तुम्ही खमंग साबुदाणा वडे ट्राय करू शकता. (Sabudana Vada Recipe) साबुदाणा वडे चवीला उत्तम आणि खायलाही मस्त लागतात. (Cooking Hacks) 

साबुदाणे वडे तेलात फुटतात. (Sabudana Vada Making Tips) त्यांची चव व्यवस्थित नसते अशी तक्रार अनेकांची असते साबुदाणे वडे चांगले होण्यासाठी तुम्ही तेल किती प्रमाणात वापरता, साबुदाणे कसे भिजवता हे फार महत्वाचे असते. साबुदाणा वडा करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make Sabudana Vada)

साबुदाणा वडा करण्याची सोपी रेसिपी (How to Make Sabudana Vada  Sabudana Vada Recipe)

१) साबुदाणा वडा बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ वेळा साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्या. जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल. साबुदाण्याच्या दुप्पट पाणी घ्या आणि रात्रभर भिजवून ठेवा किंवा तुम्हाला वेळ नसेल तर २ तासही भिजवू शकता. जर तुम्ही खूप जास्त पाणी घेतलं तर साबुदाणे गळतील आणि पदार्थ चांगला बनणार नाही म्हणून साबुदाणे व्यवस्थित भिजतील इतकं पाणी घाला.

२) बटाटे उकडून घ्या. साबुदाणे फुलल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, काळीमीरी पावडर, सैंधव मीठ, जीरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची,  भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट्ट घाला. ३ उकडलेले बटाटे कुस्करून साबुदाण्यांमध्ये घाला. साबुदाणे आणि बटाटे एकजीव करून घ्या. 

फक्त १ भाजलेला लसूण खा; कोलेस्टेरॉल कंट्रोलसाठी रामदेव बाबांचा खास उपाय-नसा होतील स्वच्छ

३) वाडग्यातून  एका मोठ्या पसरट ताटात काढून घ्या हाताला तेल  किंवा साजूक तूप लावून साबुदाणे वड्यांचे पीठ मळून घ्या.  याला आंबटपणा येण्याासाठी तुम्ही लिंबाचा रस मिसळू शकता. एका चमच्याच्या साहाय्याने साबुदाणा वड्यांचे पीठ घेऊन हाताने पसरट शेप द्या. 

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

४) कढईत तेल किंवा तूप गरम करून त्यात साबुदाणे वडे तळून घ्या. कढईत एकाचवेळी जास्त साबुदाणा वडे घालू नका. अन्यथा वडे व्यवस्थित शिजत नाही. कढईत बसतील इतकेच वडे घालून व्यवस्थित तळून घ्या. हे वडे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खाऊ शकता. 

Web Title: Maha Shivratri Special : How to Make Sabudana Vada Sabudana Vada Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.