Join us

Lunchbox Recipe : आप्पेपात्रात करा कुकीज! विकतच्या बिस्किटांपेक्षा पौष्टिक आणि खमंग बिस्किटं आता करा घरीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 12:41 IST

Lunchbox Recipe, snacks recipe, make biscuits at home, more nutritious and delicious than store-bought biscuits : घरीच करा मस्त खमंग बिस्कीट. लहान मुलांसाठी खास रेसिपी.

चहासोबत कुकीज, बिस्टीक, खारी, टोस्ट असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. विकतच्या कुकीज फार महाग असतात. तसेच ज्या अगदी स्वस्त मिळतात त्या चांगल्या दर्ज्याच्या नसतात. (Lunchbox Recipe, snacks recipe, make biscuits at home, more nutritious and delicious than store-bought biscuits)त्यामुळे घरीच मस्त कुकीज करुन खाणे हा पर्याय योग्य ठरेल. घरी खमंग कुकीज करणे एकदम सोपे आहे. ओव्हनचीही गरज नाही. साध्या आप्पे पात्रात मस्त कुकीज करता येतात. पाहा काय कराल. 

साहित्य तूप, पिठीसाखर, बेसन, कणीक, मीठ, बेकींग पावडर, दूध, बदाम, काजू, रवा

कृती१. एका खोलगट भांड्यात तूप घ्यायचे. त्यात पिठीसाखर घालायची. पिठीसाखर आणि तूप मस्त फेटायचे. एकदम छान फेटायचे. जास्त वेळ लागत नाही. घट्ट अशी पेस्ट तयार होईल. मग त्यात कणीक घालायची.  तसेच बेसन घालायचे. जरा मळून घ्यायचे. त्यात रवा घालायचा. थोडी बेकींग पावडर घालायची.अगदी थोडी घाला. थोडे दूध घालून मऊ आणि सैलसर असे पीठ मळून घ्यायचे. 

२. तूप चार ते पाच चमचे घेतले तर वाटीभर पिठीसाखर घ्यायची. तसेच वाटीभर कणीक आणि दोन ते तीन चमचे बेसन घ्यायचे. त्यात चार चमचे रवा घालायचा. बेसन आणि रवा जास्त लागत नाही. दूध मात्र हळूहळू ओता. म्हणजे जास्त पातळ होणार नाही आणि पीठ छान मळले जाईल. पीठ भिजवल्यावर झाकून ठेवायचे. त्याला वरती थोडे दूध लावायचे.

३. पाच ते दहा मिनिटांनी पुन्हा एकदा मळायचे आणि मग त्याचे लहान गोळे करायचे. पेढे तयार करायचे. बदाम  किसून घ्यायचा. किंवा पातळ काप करायचे. काजूचेही तुकडे करायचे. पेढ्यावर बदामाचे तुकडे लावायचे आणि त्यावर काजूही लावायचे. छान गोळे सेट झाले की गॅसवर आप्पे पात्र ठेवायचे. गरम करायचे. जास्त गरम करु नका. जरा कोमट करायचे.

४. आप्पे पात्रात सगळे तयार केलेले गोळे ठेवायचे. गॅस एकदम कमी ठेवायचा. दहा मिनिटांसाठी झाकून ठेवायचे. दहा मिनिटांनी जरा चमच्याने हलवून पाहायचे. वीस मिनिटांमध्ये मस्त कुकीज तयार होतात. एकदम मस्त लागतात. खमंग आणि खुसखुशीत होतात.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स