Join us
Daily Top 2Weekly Top 5

Lunch Recipe: कांदा-लसूण न घालता ट्राय करा टेस्टी दाल फ्राय; बेसनाच्या ट्रिकने होईल हॉटेलसारखी ग्रेव्ही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:53 IST

Lunch Recipe: रोजच्या जेवणात तूर, मूग, मसूर डाळीचे वरण करतो, कधीतरी चेंज म्हणून जेवणाला द्या उडीद आणि चणा डाळीच्या 'दाल फ्राय' रेसिपीचा तडका!

जेवणात जेव्हा काहीतरी चटपटीत आणि पोटभरीचं हवं असतं, तेव्हा 'डाल फ्राय' हा उत्तम पर्याय ठरतो. उडीद आणि चणा डाळीच्या मिश्रणातून तयार होणारी ही डाळ चवीला तर अप्रतिम लागतेच, पण बेसनाच्या स्लरीमुळे तिला जो दाटसरपणा येतो, तो हॉटेलच्या डाळीची आठवण करून देतो.

साहित्य:

अर्धी वाटी उडीद डाळ आणि पाव वाटी चणा डाळ

२ चमचे बेसन (स्लरीसाठी)

१ मध्यम टोमॅटो (चिरलेला) आणि हिरवी मिरची

मसाले: हळद, तिखट, धने पावडर, काश्मिरी लाल तिखट (प्रत्येकी १ चमचा)

फोडणीसाठी: तेल, मोहरी, जिरे

कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ

कृती:

१. डाळ शिजवणे:सर्वात आधी उडीद डाळ आणि चणा डाळ स्वच्छ धुवून घ्या. त्यात मीठ, हळद आणि गरजेनुसार पाणी घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या.

२. बेसन स्लरी तयार करणे:डाळ शिजत असतानाच एका वाटीत दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात थोडे पाणी घालून पातळ 'स्लरी' (द्रावण) तयार करा. यामुळे डाळीला छान दाटपणा येतो.

३. डाळ घोटणे:कुकरच्या शिट्ट्या होऊन वाफ गेल्यावर डाळ उघडा. त्यात तयार केलेली बेसनाची स्लरी घाला आणि डाळ व्यवस्थित घोटून घ्या.

४. चटपटीत फोडणी:एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे तडतडवून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आणि टोमॅटो घालून परता. टोमॅटो मऊ झाला की त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि रंगासाठी काश्मिरी लाल तिखट घाला.

५. फायनल टच:मसाले शिजले की त्यात घोटलेली डाळ आणि बेसनाचे मिश्रण ओता. सर्व पदार्थ एकजीव करा आणि डाळीला एक छान उकळी येऊ द्या. शेवटी वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा.

खाण्यासाठी तयार: ही गरमागरम आणि दाटसर डाल फ्राय तुम्ही पराठा, जीरा राईस किंवा वाफाळलेल्या साध्या भातासोबत सर्व्ह करू शकता. पाहा रेसिपी- 

English
हिंदी सारांश
Web Title : Tasty Dal Fry Recipe: Onion-Garlic Free, Hotel-Like Gravy Secret!

Web Summary : Try this delicious dal fry recipe without onion and garlic. Besan slurry creates a rich, hotel-style gravy. Perfect with rice or paratha!
टॅग्स :अन्नपाककृतीकिचन टिप्स