Lokmat Sakhi >Food > लो फॅट हाय प्रोटीन चविष्ट मुगाची टिक्की, बिनधास्त खा .. वजनाची नो फिकर

लो फॅट हाय प्रोटीन चविष्ट मुगाची टिक्की, बिनधास्त खा .. वजनाची नो फिकर

Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation : डाएटमध्ये असालाच हवा असा पदार्थ. चवीला एकच नंबर आणि पौष्टिकही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2025 08:50 IST2025-04-24T08:42:56+5:302025-04-24T08:50:02+5:30

Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation : डाएटमध्ये असालाच हवा असा पदार्थ. चवीला एकच नंबर आणि पौष्टिकही.

Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation | लो फॅट हाय प्रोटीन चविष्ट मुगाची टिक्की, बिनधास्त खा .. वजनाची नो फिकर

लो फॅट हाय प्रोटीन चविष्ट मुगाची टिक्की, बिनधास्त खा .. वजनाची नो फिकर

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे फार गरजेचे असते. पण फक्त व्यायामाने वजन कमी होत नाही. तर त्यासाठी आहारही चांगला पौष्टिक घ्यावा लागतो. (Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation)अरवटचरवट पदार्थ खाऊन चालत नाही. मात्र जिभेचे चोचले तर पुरवावेच लागतात. काही तरी चविष्ट खाल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही.  चविष्ट पदार्थ तळलेले तेलकटच असायला हवे असे काही गरजेचे नाही. पौष्टिक पदार्थ चविष्टही असू शकतात. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर डाएटमध्ये ही लो फॅट मूग टिक्की घ्यायला सुरवात करा. करायला अगदी सोपी आहे. (Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation)प्रोटीनने भरलेली आहे. चवीला अगदीच मस्त आहे. तेलाचा अजिबात वापर करु नका. थोड्याशा तुपावर हा पदार्थ करता येतो. पाहा रेसिपी.   

साहित्य
मूग, कांदा, गाजर, मटार, मीठ, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, लसूण, आलं, पनीर, बेसन, तांदळाचे पीठ, तूप, पांढरे तीळ

कृती
१. रात्र भर मूग भिजत घाला. मटार कुकरमध्ये शिजवून घ्या. पनीर छान किसून घ्या. कांदा बारीक चिरुन घ्या. गाजरही किसून घ्या. भिजलेले मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या. त्यामध्ये आल्याचा तुकडा टाका. लसणाच्या काही पाकळ्या टाका. कोथिंबीर टाका. पाणी वापरू नका. जरा जाडसर वाटून घ्या. 

२. एका परातीमध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये कांदा घ्या. कांदा अगदी बारीक चिरलेलाच वापरा. कांद्यामध्ये किसलेले गाजर घाला. तसेच शिजवलेले मटार घाला. वाटलेले मूग घाला. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. लाल तिखट घाला. हळद घाला. किसलेले पनीर घाला. थोडे बेसन घाला. थोडे तांदळाचे पीठ घाला. सगळं मस्त मिक्स करुन घ्या. पदार्थ एकजीव करुन घ्या. 

३. एका पॅनमध्ये चमचाभर तूप घाला. त्यावर पांढरे तीळ घाला. काही सेकंद परता. नंतर मिश्रणाच्या लहान टिक्की तयार करुन घ्या. त्या एक एक करुन पॅनमध्ये लावा. दोन्ही बाजूंनी मस्त परतून घ्या. टिक्की छान कुरकुरीत होईल. मग काढून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर खा. पोटभर खा. काही त्रास होणार नाही. 

Web Title: Low fat high protein tasty moong tikki, eat without hesitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.