Join us

पिझ्झा खाऊन करा वजन कमी, असा पिझ्झा कधीच नसेल केला, काही मिनिटांचे काम आणि पोटाला आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 17:23 IST

Lose weight by eating pizza, pizza like this is heathy and tasty , just a few minutes of work and your stomach will feel good : पौष्टिक पिझ्झा कधी खाल्ला का? पाहा कसा करायचा. चवीला मस्त आणि पोटासाठी चांगला.

पिझ्झा बेससाठी साहित्य मसूर डाळ, लसूण, हिरवी मिरची, मीठ, तेल, पाणी

(Lose weight by eating pizza, pizza like this is heathy and tasty , just a few minutes of work and your stomach will feel good)

पिझ्झा सॉससाठी सामग्रीटोमॅटो, कांदा, लसूण, आलं, हिरवी मिरची, तेल 

टॉपिंग्जसाठी भाज्याकांदा, टोमॅटो, सिमला मिरची, पनीर, चीज , इतर आवडीच्या भाज्या

कृती१. एका खोलगट पातेल्यात मसूर डाळ घ्यायची. व्यवस्थित धुवायची. दोन ते तीन पाण्यातून काढायची. मग भिजत घालायची. चार ते पाच तासांसाठी भिजवायची. भिजवून झाल्यावर झाकून ठेवायची. पाच तासांनी पुन्हा एकदा धुवायची. आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची. त्यात लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि थोडे पाणी घालायचे. छान वाटून घ्यायचे. सगळे पदार्थ समप्रमाणात वाटले जातील याची काळजी घ्यायची. अगदी पातळ नको मध्यम वाटायचे. 

२. कांदा बारीक चिरायचा किंवा चौकोनी चिरायचा. (Lose weight by eating pizza, pizza like this is heathy and tasty , just a few minutes of work and your stomach will feel good)सिमला मिरची चौकोनी चिरायची. तसेच पनीरचे तुकडे करायचे आणि चीज किसून घ्यायचे. बाकी तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घ्या. त्याही चिरा आणि त्याला मीठ लावा. भाज्या थोड्या परतून घ्यायच्या. अगदी शिजवून लगदा करायचा नाही फक्त शिजवायच्या. 

३. टोमॅटो बारीक चिरायचा कांदा बारीक चिरायचा. एका पॅनमध्ये लसणाच्या काही पाकळ्या तसेच आल्याचा तुकडा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे परतायचे. त्यात कांदा घालायचा आणि टोमॅटोचे तुकडे घालायचे. परतून घ्यायचे. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आणि वाटायचे. छान चटणी म्हणजेच सॉस तयार करायचा. 

४. एका खोलगट पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे त्यावर मसूरडाळीच्या वाटणाचा जाडसर असा डोसा लावायचा. जाड पोळी म्हणजेच आपला पिझ्झा बेस असणार आहे. झाकून ठेवा आणि छान शिजू द्या. एका बाजूने बेस सुटल्यावर उलटून घ्यायचा आणि शिजलेल्या वरच्या बाजूला टोमॅटोचा सॉस लावायचा. त्यावर भाज्या लावाच्या किसलेले चीज त्यावर घालायचे आणि झाकण ठेवायचे. चीज जरा वितळेल. दोन्ही बाजू छान कुरकुरीत झाल्यावर पिझ्झा ताटात काढून घ्यायचा आणि त्याचे तुकडे करायचे.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजना