भाताचे विविध प्रकार भारतात केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे हा लेमन कोरीअॅण्डर राईस. लिंबू आणि कोथिंबीर घालून केलेला हा भात चवीला एकदम जबरदस्त असतो. करायला अगदीच सोपा आहे. (Lemon Rice Recipe: Bored of eating plain rice? Try this tangy-sour rice recipe)एकदा नक्की करुन पाहा. रायता, कोथिंबीर आणि असा भात एकदम मस्त लागते. सुका भात काही जणांना आवडत नाही. त्यामुळे मग सोबत डालफ्राय किंवा वरण घेऊ शकता. तसेच चटण्या आणि दहीसोबतही छान लागतो. एकदा असा भात नक्की खाऊन पाहा.
साहित्य
बासमती तांदूळ, कोथिंबीर, लसूण, कांदा, लिंबू, तेल, लाल तिखट, पाणी, जिरे, धणे पूड, कडीपत्ता, मीठ, शेंगदाणे
कृती
१. तांदूळ स्वच्छ धुवायचा. बासमती नसेल तर साधा तांदूळही चालतो. मात्र तो जरा मऊ आणि चिकट होतो. बासमती मोकळा आणि जास्त छान होतो. तांदूळ धुवायचा आणि मग पाणी काढून टाकायचे. कांदा सोलायचा आणि छान बारीक चिरायचा. तसेच लसणाच्या काही पाकळ्या सोलायच्या आणि कांदा लांब-लांब चिरायचा. पातळ चिरा जाड ठेवायचा नाही. शेंगदाणे परतून घ्यायचे. थोड्या तेलावर खमंग परतायचे आणि मग काढून बाजूला ठेवायचे.
२. कोथिंबीरीची मस्त ताजी जुडी घ्यायची आणि व्यवस्थित निवडायची. कोथिंबीरी बारीक चिरायची. लिंबाचा रस काढून घ्यायचा. जरा जास्त घ्यायचा. लसणाच्या पाकळ्या ठेचायच्या किंवा त्याचे बारीक तुकडे करायचे. कुकरमध्ये तांदूळ लावायचे. मस्त मोकळा भात शिजवायचा. त्यासाठी पाणी कमी ठेवायचे आणि पाणी ओतण्याआधी तांदूळ परतून घ्यायचे. म्हणजे भात छान मोकळा होतो.
३. एका कढईत तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात जिरे घालायचे आणि परतायचे. जिरे तडतडल्यावर त्यात कडीपत्ता घालायचा आणि परतायचा. तसेच त्यात लसणाचे तुकडे घाला आणि लसूण छान खमंग परतून घ्यायचा. लसूण परतून झाल्यावर त्यात कांदा घालायचा आणि खमंग परतायचा. कांदा गुलाबी परतायचा. मग त्यात चिरेलली कोथिंबीर घालायची आणि छान परतायचे. तसेच त्यात धणे पूड घाला आणि चवी पुरते मीठ घालायचे. सगळे पदार्थ खमंग परतून झाल्यावर त्यात शिजवलेला भात घालायचा आणि ढवळून घ्यायचे. व्यवस्थित परतायचे. सगळे पदार्थ मस्त शिजल्यावर त्यात लिंबाचा रस पिळायचा.