Join us

उरलेल्या भाताची करा मऊसर इडली, मसाला इडली करायची एक वेगळीच पद्धत , एकबार खाके तो देखो !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 17:44 IST

leftover rice recipes, a different way to make masala idli, instant idli recipe, must try good and tasty food : उरलेल्या भाताची अशी इडली एकदा नक्की करा सगळ्यांना आवडेल. चवीला मस्तच आणि करायला सोपी.

रात्रीचा उरलेला भात कायमच फोडणी देऊन संपवता? तर एकदा ही रेसिपी करुन पाहा. इडली हा प्रकार नाश्त्यासाठी अनेकदा केला जातो. (leftover rice recipes,  a different way to make masala idli, instant idli recipe, must try good and tasty food.)मात्र इडली करण्यासाठी पूर्व तयारी करावी लागते. तसेच इंस्टंट इडली वगैरे पण करता येते. एकदा उरलेला शिजलेल्या भाताची इडली करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे आणि नेहमीच्या इडलीपेक्षा फार वेगळी चव असते. 

साधी फक्त तांदूळ आणि रवा वापरुनही ही इडली करता येते. इथे दिलेली रेसिपी मसाला इडलीची आहे. फोडणी न देताही ही रेसिपी करता येते. 

साहित्य शिजलेला भात, रवा, दही, पाणी, मीठ, तेल, इनो, लाल तिखट, कांदा, कडीपत्ता, मोहरी, जिरं, हिंग, हळद 

कृती१. उरलेल्या भाताची इडली करायला सोपी आहे फक्त भाताची पेस्ट व्यवस्थित तयार करायची. एका मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात घ्यायचा. त्यात थोडे पाणी घालायचे. जर वाटीभर भात असेल तर वाटीभर पाणी घ्यायचे. मिक्सरमधून व्यवस्थित वाटून घ्यायचे. खोलगट पातेल्यात काढून घ्यायचे. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात रवा घ्यायचा आणि त्यात दही घालायचे. वाटीभर रवा घेतला तर वाटीभर दही घ्यायचे. मस्त वाटून घ्यायचे. छान एकजीव झाले पाहिजे. नंतर रव्याचे मिश्रणही भाताच्या पेस्टमधे घलायचे. 

२. कांदा सोलायचा आणि एकदम बारीक चिरायचा. फोडणी पात्रात थोडे तेल घ्यायचे. तेल गरम करायचे आणि त्यात चमचाभर जिरे घालायचे. तसेच मोहरी घालायची आणि छान तडतडू द्यायची. मग त्यात कडीपत्ता घालायचा तसेच हिंग घालायचे आणि मग छान परतायचे. गॅस बंद करायचा आणि त्यात हळद तसेच लाल तिखट आणि मीठ घालायचे. चमच्याने ढवळायचे आणि करपण्याआधीच मिश्रणात ओतायचे. छान ढवळून घ्यायचे. त्यात इनो घालायचे. 

३. इडली पात्राला तेल लावायचे आणि मग त्यात तयार मिश्रणाच्या इडली लावायच्या. किमान वीस मिनिटे इडली वाफवायची. गरमागरम मसाला इडली तयार होते. चवीला साध्या इडलीपेक्षा एकदम वेगळी लागते. ना काही आंबवायची गरज ना जास्त कष्ट करायची गरज. झटपट होणारी रेसिपी आहे.  

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स