Join us

भात खूप उरलाय, करुन पाहा शिळ्या भाताची इडली! झटपट आणि हलकी-इडली खा गरमागरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 14:54 IST

Leftover Rice Idli Recipe : नेहमी नेहमी त्याच चवीचा फोडणीचा भात अनेकांना खावासा वाटत नाही. उरलेल्या भातापासून झटपट इडली सुद्धा बनवू शकता. हा कमी तेलकट कमी कॅलरीजयुक्त नाश्ता आहे.

 भात हा सर्वांच्याच  घरातील रोजच्या खाण्यातला पदार्थ. भाताशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही असे अनेकजण असतात. पण भात गरमागरम आणि ताजा असेल तर जेवणाची मजाच काही वेगळी. (Cooking Hacks) दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर भात उरला तर तो खाण्यासाठी अनेकदा कंटाळा केला जातो. (Idli Recipe) भात वाया जाऊ नये यासाठी अनेकदा फोडणीचा भातही बनवला जातो. (Leftover Rice Recipes)

नेहमी नेहमी त्याच चवीचा फोडणीचा भात अनेकांना खावासा वाटत नाही. उरलेल्या भातापासून झटपट इडली सुद्धा बनवू शकता. हा कमी तेलकट कमी कॅलरीजयुक्त नाश्ता आहे. (How to make instant idli with leftover cooked rice) जेवणासाठीही  तुम्ही उरलेल्या भाताच्या इडल्या बनवू शकता. खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही उरलेल्या भाताच्या स्वादीष्ट इडल्या बनवू शकता. (How to make idli from  leftover rice)

१) उरलेल्या भाताची इडली  बनवण्यासाठी सगळ्यात आधी भात मिक्सरच्या भांड्यात काढून दळून घ्या.  दळलेला भात एका ताटात काढून घ्या. त्यात एक वाटी रवा, एक वाटी दही आणि पाणी घालून एकजीव करा. मिश्रण जास्त घट्ट वाटत असेल तर गरजेनुसार हळूहळू पाणी घालून एकजीव करून घ्या.

२) त्यात १ चमचा मीठ, एक चमचा बेकींग सोडा घालून ढवळून घ्या हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी झाकण लावून बाजूला ठेवा. त्यानंतर एका इडलीच्या साच्याला तेल लावून त्यात हे मिश्रण भरा.

३) इडली १० ते १५ मिनिटं वाफवण्यासाठी ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. या इडल्या तुम्ही चटणी किंवा सांबारबरोबर खाऊ शकता. चवीला उत्तम अशा इडल्या करायला एकदम सोप्या आहेत. 

उरलेल्या भाताचा लेमन राईस कसा बनवावा?

उरलेल्या भाताचा लेमन राईस बनवणं एकदम सोपं आहे. यासाठी तुम्हाला  जास्तीत जास्त १० मिनिटं लागतील. एक तास आधी चण्याची डाळ भिजवून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्य तेल गरम करा. त्यात मोहोरी, मिरची, कढीपत्त्याची फोडणी घाला. त्यानंतर शेंगदाणे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर त्यात एक कांदा घाला.

आता त्यात भिजवलेली चणा डाळ आणि हिरव्या मिरचीचे  तुकडे घाला. त्यानंतर उरलेला भात हाताने मोकळा करून कढईत घाला आणि बाकीच्या पदार्थांसह मिसळा. व्यवस्थित मिसळ्यानंतर यात लिंबाचा रस घाला आणि कोथिंबीर घालून गार्निश करा. तयार आहे गरमागरम लेमन राईस.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स