Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मुलांच्या आवडीची नटेला कुल्फी उन्हाळ्यापूर्वी शिकून घ्या, सुपर क्रिमी आणि चॉकलेटी कुल्फी करण्याची सोपी रेसिपी

मुलांच्या आवडीची नटेला कुल्फी उन्हाळ्यापूर्वी शिकून घ्या, सुपर क्रिमी आणि चॉकलेटी कुल्फी करण्याची सोपी रेसिपी

Learn how to make kids' favorite Nutella Kulfi before summer, an easy recipe to make super creamy and chocolatey Kulfi : नटेला कुल्फी करण्याची सोपी आणि चविष्ट रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2026 15:42 IST2026-02-03T15:41:51+5:302026-02-03T15:42:47+5:30

Learn how to make kids' favorite Nutella Kulfi before summer, an easy recipe to make super creamy and chocolatey Kulfi : नटेला कुल्फी करण्याची सोपी आणि चविष्ट रेसिपी.

Learn how to make kids' favorite Nutella Kulfi before summer, an easy recipe to make super creamy and chocolatey Kulfi | मुलांच्या आवडीची नटेला कुल्फी उन्हाळ्यापूर्वी शिकून घ्या, सुपर क्रिमी आणि चॉकलेटी कुल्फी करण्याची सोपी रेसिपी

मुलांच्या आवडीची नटेला कुल्फी उन्हाळ्यापूर्वी शिकून घ्या, सुपर क्रिमी आणि चॉकलेटी कुल्फी करण्याची सोपी रेसिपी

नटेला कुल्फी ही आजकाल मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झालेला गोड पदार्थ आहे. चॉकलेट आणि हेजलनटची मस्त चव असल्यामुळे नटेला मुलांना मनापासून आवडते आणि त्याच नटेलापासून केली जाणारी कुल्फी म्हणजे त्यांच्या आनंदाला अजूनच दुहेरी मजा देणारी गोष्ट ठरते.

ही कुल्फी खास लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून तयार केली जाते असे म्हणायला हरकत नाही. तिची चव सौम्य, फार गोड नसलेली आणि चॉकलेटी असल्यामुळे मुले आवडीने खातात. थंड, मऊसर आणि क्रीमी पोत असल्यामुळे दातांना त्रास न होता सहज खाता येते, त्यामुळे अगदी लहान वयाच्या मुलांसाठीही ती आकर्षक ठरते.

नटेला कुल्फी घरीच प्लास्टिकच्या कपात करता येते. रंगीत छोटे कप, कार्टून डिझाइनचे कप किंवा पेपर कपमध्ये कुल्फी सेट केली तर मुलांना ती अधिकच आवडते. पार्टीसाठी किंवा पाहुण्यांसाठी नक्की करा. अगदी काही मिनिटांचे काम आहे. मुलेच नाही सगळ्यांनाच मनापासून आवडेल असा पदार्थ आहे.  

साहित्य 
चॉकलेट, क्रिम, साखर, नटेला, लहान प्लॅस्टिक कप 

कृती 
१. नटेला चॉकलेटचे लिक्विड घ्यायचे. चहासाठी किंवा कॉफीसाठी वापरता तसे प्लास्टिकचे कप घ्यायचे. त्या कपाला नटेला चॉकलेट सगळीकडे लावायचे. नीट लावायचे. 

२. क्रिम एका खोलगट भांड्यात घ्यायचे, त्यात थोडी साखर घालायची. क्रिम आणि साखर फेटून घ्यायचे. व्यवस्थित छान फेटायचे. फेटून झाल्यावर ते क्रिम कपमध्ये भरायचे. त्याच्यामधे आवडते चॉकलेट भरा आणि मग पुन्हावरतून नटेलाचा थर लावा. 

३. कप रात्रभर फ्रिझरमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी कप काढून टाका आणि गारेगार नटेला कुल्फी खा. अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की करुन पाहा. 

 

Web Title : नटेला कुल्फी बनाना सीखें: एक सरल, क्रीमी रेसिपी।

Web Summary : नटेला कुल्फी, बच्चों की पसंदीदा, चॉकलेट और हेज़लनट का मिश्रण है। प्लास्टिक के कप में घर पर बनाना आसान है, यह बच्चों और पार्टियों के लिए एकदम सही क्रीमी, हल्का मीठा व्यंजन है। बस नटेला, क्रीम और चॉकलेट की परत लगाएं, फ्रीज करें और आनंद लें!

Web Title : Learn to make Nutella Kulfi: A simple, creamy recipe.

Web Summary : Nutella Kulfi, a kid-favorite, blends chocolate and hazelnut. Easy to make at home in plastic cups, it's a creamy, mildly sweet treat perfect for children and parties. Simply layer Nutella, cream, and chocolate, freeze, and enjoy!