Lokmat Sakhi >Food > चटकदार लसूणी बटाटा भजी! पावसाळ्यात एकदा ही भजी खा, बाकीची भजी विसरुन जाल...

चटकदार लसूणी बटाटा भजी! पावसाळ्यात एकदा ही भजी खा, बाकीची भजी विसरुन जाल...

Lasuni Batata Bhaji : Lasaniya Bataka Puri : Dabda Bhajiya : How To Make Lasuni Batata Bhaji At Home : पावसाळ्यात बटाटा भजी तर नेहमी करतोच, पण यंदा काहीतरी वेगळं म्हणून करा लसूणी बटाटा भजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 17:23 IST2025-07-07T17:23:16+5:302025-07-07T17:23:59+5:30

Lasuni Batata Bhaji : Lasaniya Bataka Puri : Dabda Bhajiya : How To Make Lasuni Batata Bhaji At Home : पावसाळ्यात बटाटा भजी तर नेहमी करतोच, पण यंदा काहीतरी वेगळं म्हणून करा लसूणी बटाटा भजी...

Lasuni Batata Bhaji Lasaniya Bataka Puri Dabda Bhajiya How To Make Lasuni Batata Bhaji At Home | चटकदार लसूणी बटाटा भजी! पावसाळ्यात एकदा ही भजी खा, बाकीची भजी विसरुन जाल...

चटकदार लसूणी बटाटा भजी! पावसाळ्यात एकदा ही भजी खा, बाकीची भजी विसरुन जाल...

पावसाळा आणि भजी यांचे नाते अतूटच आहे. पावसाळा हा भजी शिवाय अपूर्णच आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गरमागरम भजी खाण्याची मज्जा काही (Lasuni Batata Bhaji) औरच असते. बाहेर धो - धो कोसळणारा पाऊस पाहिला की लगेच भाजी खाण्याचा मोह आवरता येत नाही. पावसाळ्यात (Lasaniya Bataka Puri) आपण कांदा, बटाटा, मूग पालक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या अगदी ताव मारत पोटभर खातोच. या सगळ्याच प्रकारच्या भजी मधील बटाटा भजी सगळ्यांच्याच विशेष आवडीची(How To Make Lasuni Batata Bhaji At Home).

गरमागरम टम्म फुगलेली बटाट्याची भजी आणि सोबत मस्त वाफाळता चहा असा बेत पावसाळ्यात प्रत्येक घरोघरी किमान एकदा तरी होतोच. आपण बटाटा भजी तर नेहमीच खातो, परंतु नेहमीपेक्षा थोडी वेगळी आणि हटके रेसिपी असणारी लसूणी बटाट्याची भजी म्हणजे पावसाळ्यातील अस्सल मेजवानीच! बटाटा भजीमध्ये मसाल्याचे सारण भरुन मग बेसन पिठात घोळवून खमंग तळलेली लसूणी बटाटा भजी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात...

साहित्य :- 

१. पिवळी बारीक शेव - १/४ कप 
२. पांढरे तीळ - २ टेबलस्पून 
३. धणे - १ टेबलस्पून 
४. काळीमिरी - ७ ते ८ 
५. लाल मिरची पावडर - ३ ते ४ टेबलस्पून 
६. साखर - १ टेबलस्पून 
७. आल्याचा छोटा तुकडा - १ तुकडा
८. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
९. धणे - जिरे पूड - १ टेबलस्पून 
१०. आमचूर पावडर - १ टेबलस्पून  
११. मीठ - चवीनुसार
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. तेल - ५ ते ६ टेबलस्पून 
१४. बेसन - २ कप 
१५. तांदुळाच पीठ - १/२ कप 
१६. हळद - १/२ टेबलस्पून 
१७. ओवा - १/२ टेबलस्पून 
१८. पाणी - गरजेनुसार

साबुदाणा न भिजवताच करा इडली पात्रात इन्स्टंट साबुदाणा वडा, पावसाळी हवेत खा गरमागरम वडे...


गरमगरम मऊ लुसलुशीत लोणी स्पंज डोसा करण्याची पाहा परफेक्ट पद्धत आणि प्रमाण, पावसाळ्यातली मेजवानी...

कृती :- 

१. सगळ्यातआधी बटाटे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचे भजीसाठी गोलाकार काप करून घ्यावेत. 
२. एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पिवळी बारीक शेव, पांढरे तीळ, धणे, काळीमिरी, लाल मिरची पावडर, साखर, आल्याचा छोटा तुकडा, लसूण पाकळ्या, धणे - जिरे पूड, आमचूर पावडर, चवीनुसार मीठ असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन त्याची जाडसर भरड तयार करून भजीसाठीचे स्टफिंग तयार करून घ्यावे. 

३. आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व तेल घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. 
४. आता बटाट्याच्या गोलाकार कापलेल्या चकत्या घेऊन त्यावर हे स्टफिंग व्यवस्थित पसरवून लावून घ्यावे. मग त्यावर अजून एक बटाटयाची चकती ठेवून द्यावी. अशा प्रकारे बटाट्याच्या चकत्यांमध्ये स्टफिंग भरुन ठेवावे. 
५. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, तांदुळाच पीठ, हळद,ओवा, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर व गरजेनुसार पाणी ओतून मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे.
६. आता स्टफिंग भरुन ठेवलेल्या भज्या, तयार बेसनाच्या बॅटरमध्ये घोळवून कढईत गरम तेलात खरपुस तळून घ्याव्यात. 

लसूणी बटाटा भजी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम लसूणी बटाटा भजी हिरव्या आणि सुक्या लाल चटणी सोबत खाण्यासाठी अधिकच चविष्ट लागते. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गरमागरम लसूणी बटाटा भजी खाण्याची मज्जा काही औरच असते. नेहमीची बटाटा भजी करण्यापेक्षा यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी लसूणी बटाटा भजीचा मस्त बेत करुन पाहाच.

Web Title: Lasuni Batata Bhaji Lasaniya Bataka Puri Dabda Bhajiya How To Make Lasuni Batata Bhaji At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.