लहान मुलांना बाहेरचे - विकतचे अरबटचरबट खायला फार आवडते. चिप्स, लेज, कुरकुरे लहानच नाही तर मोठेही आवडीने खातात. मात्र विकतचे असे पदार्थ आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. (Kurkure recipe - spicy and crunchy kurkure, very easy to make at home, a special recipe for kids)खास म्हणजे कुरकुऱ्यांसारखे विकतचे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. त्यात जास्त मीठ, तिखट व कृत्रिम घटक असतात. तयार करण्याची पद्धतही कृत्रिम आणि जरा वेगळी असते. त्यामुळे पोटदुखी, लठ्ठपणा आणि इतर त्रास होऊ शकतात. मुलांना सुरक्षित, पौष्टिक आणि चविष्ट स्नॅक्स द्यायचे असतील तर घरचे कुरकुरे सर्वोत्तम पर्याय आहेत. घरी विकतसारखे मस्त कुरकुरे करणे अगदी सोपे आहे नक्की करुन पाहा.
साहित्य
तांदूळाचे पीठ, बेसन, कॉर्नफ्लावर, मीठ, सोडा, पाणी, तेल, मीठ, काळं मीठ, चाट मसाला, लाल तिखट
कृती
१. तांदळाचे वाटीभर पीठ घेत असाल तर त्यात चार चमचे बेसन घाला. तसेच दोन चमचे कॉर्नफ्लावर घाला आणि थोडा सोडा घालून पीठ मळून घ्या. अगदी थोडा सोडा घाला. थोडे मीठ घाला आणि हळूहळू पाणी घालून पीठ मळून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर अगदी पाच मिनिटे ते पीठ परतून घ्या. तांदळाची उकड जशी करता त्याहून जरा घट्ट पीठ हवे. गॅस बंद करा आणि पीठ काढून घ्या. तेल लावा आणि मळून घ्या. छान मळून झाल्यावर हाताला तेल लावा आणि त्याला कुरकुऱ्यांसारखा आकार द्या.
२. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात एकएक करुन कुरकुरे सोडा आणि तळून घ्या. तळताना गॅस मध्यम ठेवा. जास्त वेळ लागू द्या. मात्र कुरकुरे छान खमंग परता. नंतर एका खोलगट पातेल्यात काढून घ्या. (Kurkure recipe - spicy and crunchy kurkure, very easy to make at home, a special recipe for kids)त्यात चमचाभर काळं मीठ घाला. तसेच दोन चमचे चाट मसाला घाला. आवडीनुसार लाल तिखट घाला. कुरकुरे मस्त मिक्स करा. सगळा मसाला छान लागेल याची काळजी घ्या.
३. गार झाले की एकदम कुरकुरीत होतात. चवीला अगदी विकत सारखे लागतात. नक्की करुन पाहा. त्यात आवडत असेल तर पेरीपेरी मसालाही घालू शकता. तसेच इतरही मसाले घालू शकता.