कोल्हापूर या शहराला भलामोठा ऐतिहासिक वारसा आहे. त्याचप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही जगभर प्रसिद्ध आहे. कोल्हापुरची झणझणीत मिसळ, तांबडा आणि पांढरा रस्सा हे कोल्हापूरची ओळख सांगणारे काही खास पदार्थ. आता जे लोक शाकाहारी आहेत त्यांना कोल्हापुरी मिसळीची चव चाखता येते. पण तांबडा आणि पांढरा रस्सा मात्र त्यांना चालत नाहीत. म्हणूनच आता तुम्हीही शाकाहारी असाल पण तरीही कोल्हापूरच्या पांढऱ्या रश्श्याची चव घेण्याची तुमची इच्छा असेल तर मसूरचा वापर करून व्हेज स्टाईलने तुम्ही पांढरा रस्सा करू शकता (how to make Kolhapur style pandhra rassa?). सेलिब्रिटी शेफ स्मिता देव यांनी ही खास रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Kolhapur style pandhra rassa recipe)
व्हेज स्टाईलने केलेला कोल्हापूरचा प्रसिद्ध पांढरा रस्सा रेसिपी
कृती
पांढरा रस्सा करण्यासाठी सगळ्यात आधी तर एक कप मसूर घ्या. ते २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यानंतर ७ ते ८ तासांसाठी भिजत घाला. दिड कप किसलेलं नारळ, २ टेबलस्पून काजू आणि १ चमचा खसखस मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि त्यात थोडंसं पाणी घालून त्याची चांगली बारीक प्युरी करून घ्या.
मुलांच्या तब्येतीची खरंच काळजी वाटते ना? ५ पदार्थ चुकूनही देऊ नका, लिव्हर- किडन्या होतील खराब
यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये २ चमचे तूप किंवा बटर घाला. त्यामध्ये दालचिनीचा एखादा इंचाचा तुकडा, ३ ते ४ वेलची, ३ ते ४ लवंग, एखादं दगडफूल आणि ७ ते ८ मिरे घालून मंद आचेवर परतून घ्या.
त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा घाला आणि अगदी एखादा मिनिट तो परतून घ्या. परतून घेताना कांद्याचा रंग बदलू देऊ नका. त्याआधीच त्यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट, ४ ते ५ हिरव्या मिरच्या घाला आणि सगळे पदार्थ पुन्हा एकदा खमंग परतून घ्या.
डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण हाेऊ नका, चमचाभर कापूर 'या' पद्धतीने वापरा- १ आठवड्यात कोंडा गायब
यानंतर त्यामध्ये १ कप भिजवून शिजवून घेतलेले अख्खा मसूर आणि मिक्सरमधून बारीक केलेलं पांढरं वाटण घाला. यानंतर गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला घालून ग्रेव्हीला १० ते १२ मिनिटे चांगली उकळी येऊ द्या. हा मसूरीचा पांढरा रस्सा तुम्ही पोळी, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता.
