कोण कशा पद्धतीने जेवण करतं हा एक मोठाच अभ्यास आणि निरिक्षणाचा विषय असतो. एकेकाच्या जेवणाच्या सवयीही मजेशीर असतात. कोणी गप्पा मारत मारत जेवतं तर कोणाला जेवण करताना अजिबात बोललेलं चालत नाही. काेणी प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत छान चवीने जेवतं तर कोणाला पानात काय आहे, याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. उदर भरण एवढेच त्यांना माहिती असते. काही जण एकेक घास अक्षरश: ३२ वेळा चावत निवांत रवंथ करत जेवतात तर काही जण पटापट जेवतात. जेवणाची पंगत अर्ध्यापर्यंतही येत नाही, तोवर या मंडळींचं जेवण उरकलेलं असतं (Know How Eating Quickly Can Affect Your Weight And Digestion). तुम्हीही याच प्रकारात मोडत असाल म्हणजेच तुम्हालाही खूप पटापट जेवण करण्याची सवय असेल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर आणि वजनावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया...(what are the effects of eating too fast on your body and weight?)
खूप भराभर जेवण केल्यामुळे तब्येतीवर आणि वजनावर होणारे परिणाम
नेहमीच खूप पटापट जेवण करण्याची सवय असल्यास काय होतं याविषयी एका रिसर्चमध्ये दिलेली माहिती इंडिया टीव्हीने प्रकाशित केली आहे.
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे लोक सावकाश आणि प्रत्येक घास व्यवस्थित चावून जेवतात त्यांचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. काही अभ्यासानुसार असं सांगण्यात येतं की तुम्ही जेवल्यानंतर साधारण २० मिनिटांनी तुम्हाला याची जाणीव होते की पोट भरलेलं आहे. जे लोक खूप भराभर जेवतात, त्यांना ही जाणीव होण्यापुर्वीच त्यांच्या शरीरात गरजेपेक्षा जास्त कॅलरी गेलेल्या असतात. याचा परिणाम वजनावरही होतोच.
वेगात जेवताना प्रत्येक घास बारीक चावून खाल्ला जात नाही. त्यामुळे ॲसिडीटी, अपचन, बद्धकोष्ठता असेही त्रास हाेतात.
ऊन वाढल्याने घरातही खूप गरम वाटतं? ५ गोष्टी करा, घरात वाटेल थंडगार- शांत...
काही अभ्यासकांच्यामते खूप भराभर जेवण करण्याची सवय असल्यास टाईप २ डायबिटीसचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कमीतकमी २० मिनिटांचा वेळ तरी जेवणासाठी दिलाच पाहिजे.
प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घेत जेवण केल्याने मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते. शरीर आणि मन रिलॅक्स होते. त्यामुळे जेवताना घाई करू नका.