सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे पालेभाज्या तसेच पत्ताकोबी, फुलकोबी यांच्यासारख्या भाज्या खाण्यापुर्वी थोडी काळजी घ्यायलाच हवी. कारण या दिवसांत भाज्यांमध्ये किडे, अळ्या होण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच या दिवसांत भाज्या थोड्या अधिक काळजीपुर्वक धुवायला हव्या. पत्ताकोबीच्या पानांआड काही बारीक किडे, अळ्या असू शकतात. आपण जर ती वरवर धुतली तर ती अजिबातच स्वच्छ होत नाही (how to clean cabbage?). त्यामुळेच पत्ताकोबी अगदी स्वच्छ करण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(simple tips and tricks to clean cauliflower and cabbage)
पत्ताकोबी कशी स्वच्छ करावी?
१. मिठाच्या पाण्याचा वापर करून पत्ताकोबी स्वच्छ करता येते. यासाठी पाणी थोडे गरम करून घ्या. आता पाण्यामध्ये २ ते ३ चमचे मीठ घाला. या पाण्यात पत्ताकोबी १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा. ती स्वच्छ होईल.
पुदिना निवडायलाच वेळ नाही? ‘असा’ ठेवा फ्रिजमध्ये, १५ दिवस राहील ताजा-सुगंधी आणि हिरवागार
२. दुसरा उपाय करण्यासाठी हळद आणि लिंबू यांचा वापर करा. हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा हळद आणि २ चमचे लिंबाचा रस घाला. आता पत्ताकोबी हातानेच थोडी मोकळी करा आणि ती या पाण्यात १५ ते २० मिनिटांसाठी भिजत घाला. यानंतर पुन्हा एकदा ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
३. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर यांचा वापर करूनही पत्ताकोबी स्वच्छ करता येते. हा उपाय करण्यासाठी पत्ताकोबी चिरून घ्या. यानंतर ती एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये टाका.
Friendship Day: ५ युनिक गिफ्ट आयडिया! मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं म्हणजे काहीतरी खास हवंच
आता त्या पाण्यामध्ये बेकिंग सोडा आणि थोडे व्हिनेगर घाला. पाण्याला हलकी उकळी येऊ द्या. यानंतर गॅस बंद करा. काही वेळ पत्ताकोबी त्या गरम पाण्यातच राहू द्या. त्यानंतर पाणी काढून टाका आणि ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अगदी साफ होईल.