रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणाला बऱ्याच घरांमध्ये खिचडी केली जाते. संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीनं खिचडी खाल्ली जाते. खिचडी हे एक संतुलित आणि सकस अन्न आहे. खिचडी खाणं हे शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही उत्तम मानले जाते. खिचडी करायला सोपी असते. ज्यातून शरीराला बरेच पोषक घटकही मिळतात. खिचडीतून शरीराला प्रोटीनचे संपूर्ण पॅकेज मिळते. (Food For Protein)
खिचडीतून शरीराला काही महत्वाची पोषक तत्व मिळतात जी इतर पदार्थांमधून मिळत नाहीत. आठवड्यातून कितीवेळा खिचडी खायला हवी याबाबत अपोला रुग्णालयातील वरिष्ठ आहारतज्त्र डॉ. प्रियांका रोहतगी यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Khichdi Is Heathiest Best Food In Nutrition Value It Gives 20 Types Of Protein To Body)
खिचडी आहे प्रोटीनचा भंडार (Eat Khichdi For Protein)
डॉ. प्रियांका सांगतात की आपल्या शरीराला प्रोटीनची भरपूर आवश्यकता असते. जर खिचडीला प्रोटीनयुक्त म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आपल्या शरीराला २० ते २२ अमिनो एसिड्स गरजेचे असतात ज्यात प्रोटीन असते. तांदळातून शरीराला काही अमीनो एसिड्स मिळतात तर काही अमिनो एसिड्स डाळीतून मिळतात. हे दोन्ही एकत्र केल्यास २० प्रकारचे अमीन एसिड्स शरीराला मिळतात आणि शरीराला एक कंम्पलीट प्रोटीन पॅकेज मिळतं. याव्यतिरिक्त अनेक न्युट्रिएंट्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेटस आणि व्हिटामीन्स शरीराला मिळतात.
भारतात खिचडी दही, पापड, तूप किंवा लोणच्यासोबत खाल्ली जाते. तुम्ही यासोबतच कोथिंबीरीची हिरवी चटणीसुद्धा खाऊ शकता. हे सर्व पदार्थ फक्त खिचडीची चव वाढवत नाहीतर न्युट्रिएंट्सची पॉवर अधिक वाढतात आणि शरीरातील न्युट्रिशनल वॅल्यू वाढवतात.
आठवड्यातून किती वेळा खिचडी खावी?
उन्हाळा असो किंवा हिवाळा खिचडी हा पदार्थ सर्वात उत्तम आहे. आठवड्यातून एकदा न खाता रोजसुद्धा तुम्ही खिचडी खाऊ शकता. लहान मुलांना खिचडी खाऊ घातल्यानं त्यांना एक कंप्लिट फूड मिळते. खिचडी पचायला हलकी असते.
तांदळासोबत कोणत्या डाळी खिचडीत असाव्यात
डॉ. प्रियांका सांगतात की खिचडीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. बासमती किंवा कोणताही भात. साल असलेली मूग डाळ मिक्स करा. साल असलेली मुग डाळ फायबर्स आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. यात मटार, गाजर, शिमला मिरची, बीन्स आणि फूलकोबी इतर भाज्याही घालू शकता.
Web Summary : Khichdi is a balanced, nutritious, and easy-to-digest food, providing a complete protein package. It contains essential amino acids from rice and lentils, offering numerous nutrients, minerals, and vitamins. Nutritionists recommend eating khichdi regularly, incorporating vegetables and serving it with yogurt or chutney to enhance its nutritional value.
Web Summary : खिचड़ी एक संतुलित, पौष्टिक और आसानी से पचने वाला भोजन है, जो प्रोटीन का पूरा पैकेज प्रदान करता है। इसमें चावल और दाल से आवश्यक अमीनो एसिड होते हैं, जो कई पोषक तत्व, खनिज और विटामिन प्रदान करते हैं। पोषण विशेषज्ञ नियमित रूप से खिचड़ी खाने, सब्जियों को शामिल करने और इसके पोषण मूल्य को बढ़ाने के लिए इसे दही या चटनी के साथ परोसने की सलाह देते हैं।