Join us

वाटीभर रवा- बेसनाचा करा मऊ-जळदार ढोकळा; ५ मिनिटांत कटोरी ढोकळा करण्याची सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 13:21 IST

How to Make Soft Spongy Dhokla : घरच्याघरी बेसन आणि रव्याचा वापर करून तुम्ही ढोकळा बनवू शकता. (Katori Dhokla)

ढोकळा (Dhokla) हा पदार्थ नाश्त्याला जास्तीत जास्त लोक आवडीने खातात. (How to Make Dhokla Recipe) ढोकळा घरी बनवायचं म्हटलं की ढोकळा फुलत नाही जास्त मऊ होतो. ढोकळा खाण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून ढोकळा विकत आणण्याची काही गरज नाही. (How To Make Soft Spongy Dhokla) घरच्याघरी बेसन आणि रव्याचा वापर करून तुम्ही ढोकळा बनवू शकता. (Katori Dhokla) कटोरी ढोकळा किवा वाटीतला ढोकळा करण्याची सोपी पद्धत पाहूया. (Dhokla Recipe)

1) ढोकळ्याचे पीठ  मिक्सरच्या भांड्यात तयार करू शकता. घरातील कोणत्याही एका वाटीचे प्रमाण घ्या जेणेकरून पदार्थ बिघडणार आणि ढोकळा चांगला फुलून येईल. दिडशे ग्राम  बारीक रवा घ्या. यात १ वाटी दीडशे ग्रॅम चण्याच्या डाळीचे पीठ घ्या.  त्यात वाटीभर दही घाला. (Khaman Dhokla Recipe Soft And Spongy)

मुलं २० वर्षांचे होण्यापूर्वी त्यांना यायलाच हव्या ‘या’ ५ गोष्टी, नाहीतर पालकांवर येते पश्चातापाची वेळ

2) त्याच वाटीत १ कप पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात घाला, त्यात चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घाला. १ लिंबू पिळून घ्या. सर्व पदार्थ मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्या बारीक पेस्ट तयार झाल्यानंतर हे मिश्रण एक भांड्यात काढून चमच्याच्या साहाय्याने ढवळून घ्या.

3) एका मोठ्या भांड्यात ढोकळा वाफवा किंवा तुम्ही इडलीच्या कुकरचा वापर करू शकता. स्टिलच्या भांड्यात ढोकळा शिकवा जेणेकरून ढोकळा पटकन शिजेल. वाट्यांना तेल लावून घ्या. त्यात पीठ घाला,  त्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला. एकाच दिशेने २ मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या. 

4) फ्लफी, हलकं फुलकं पीठ १० ते १५ मिनिटांत तयार होईल. कुकरमध्ये पाणी उकळल्यानंतर त्यात ढोकळ्याच्या पीठ भरलेल्या वाट्या ठेवा. १५ मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम वाटी ढोकळा. ढोकळा फुलल्यानंतर वरून चिरा पडलेल्या दिसतील. वाट्या बाजूला काढून घ्या.

पोटभर भात खा १ किलो पण वजन वाढणार नाही; भात करण्याची १ सोपी पद्धत, स्लिम दिसाल

5) एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात राई, जीरं, मोहोरी, मिरची, कढीपत्ता, साखर आणि मीठ घालून विरघळवून घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घाला. पाणी गरम झाल्यानंतर थोडं थंड होऊ द्या आणि फोडणी ढोकळ्यांवर घाला. तयार आहे मऊ, जाळीदार ढोकळा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स