Join us

केरळस्टाईल जाळीदार, सॉफ्ट अप्पमची खास रेसिपी; ५ मिनिटांत बनेल अप्पम, झटपट नाश्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:25 IST

Kerala style soft Appam : हे पदार्थ घरी करणंही एकदम सोपं आहे. केरळस्टाईलचे जाळीदार अप्पम (South Indian Style Appam) घरी कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूया.

साऊथ इंडियन पदार्थ सर्वांचेच फेव्हरेट असतात. फक्त इडली, मेदूवडाच नाही तर उथप्पा, अप्पम, अप्पे असे बरेच पदार्थ प्रत्येक राज्यातील लोकांचे फेव्हरेट आहेत. साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Appam) फक्त चवीला उत्तम नसून आरोग्याच्या दृष्टीनंही गुणकारी, हेल्दी असतात. हे पदार्थ घरी करणंही एकदम सोपं आहे. केरळस्टाईलचे जाळीदार अप्पम (South Indian Style Appam) घरी कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूया. कमीत कमी तेलात कमी साहित्यात  केली जाणारी ही रेसिपी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. (Kerala Appam South Indian Style Appam Recipe)

अप्पम करण्याची खास रेसिपी

१ कप अप्पम राइस (किंवा साधा इडली राइस)

१/४ कप शिजवलेला भात (शिळा भातही चालेल)

१/२ कप किसलेलं ताजं नारळ

१/२ चमचा यीस्ट

१ चमचा साखर

चवीनुसार मीठ

आवश्यकतेनुसार पाणी

अप्पम करण्याची सोपी कृती

सर्वप्रथम, अप्पम राइस दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि कमीत कमी ४-५ तास भिजत ठेवा. भिजवलेल्या तांदळातील पाणी काढून टाका. आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ, शिजवलेला भात, किसलेले नारळ, साखर आणि पुरेसं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावी. मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.

एका लहान वाटीत थोड्या कोमट पाण्यात यीस्ट आणि चिमूटभर साखर मिसळा. १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा. यीस्ट फुलून त्यावर फेस आल्यावर, ते तांदळाच्या मिश्रणात मिसळा. आता या मिश्रणावर झाकण ठेवून ते गरम ठिकाणी ६-८ तास किंवा रात्रभर आंबवण्यासाठी ठेवा. मिश्रण आंबल्यावर ते दुप्पट फुललेले दिसेल.

आंबवलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घाला. जर मिश्रण खूप घट्ट वाटत असेल, तर थोडं पाणी घालून ते इडलीच्या पिठासारखं पातळ करा. अप्पम बनवण्यासाठी नॉन-स्टिक कढई किंवा खास अप्पम कढई वापरल्यास उत्तम. कढई मध्यम आचेवर गरम करा.

 ढाबास्टाईल पनीर भुर्जी करण्याची खास रेसिपी; १० मिनिटांत बनेल चटपटीत पनीर भुर्जी

एक मोठा चमचा पीठ घेऊन गरम कढईच्या मध्यभागी घाला. कढई लगेच दोन्ही हातांनी पकडून गोल गोल फिरवा जेणेकरून पीठ कढईच्या बाजूने पसरून एक पातळ थर तयार होईल. मधला भाग जाड राहील. कढईला झाकण लावून २-३ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्या. अप्पमची कडा सोनेरी आणि जाळीदार झाल्यावर आणि मधला भाग मऊ झाल्यावर गॅस बंद करा.

चहात आधी काय घालावं-दूध,साखर की चहा पावडर? पाहा टपरीस्टाईल कडक चहा करण्याची पद्धत

गरमागरम अप्पम नारळाच्या चटणी सोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा. या पद्धतीने बनवलेले अप्पम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, स्पंजसारखे होतात. बाहेर गाडीवर मिळतात तसे अप्पम घरीच तुम्हाला खायला मिळतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स