लवंग हा पदार्थ आपण प्रामुख्याने मसाल्यात वापरतो. पण लवंग केवळ स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात लवंगेला औषधी गुणधर्म असलेला पदार्थ म्हणून ओळखले जाते. लहानशी दिसणारी ही लवंग अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर उपयोगी ठरु शकते.
प्रवासाला जाताना अनेकांना मळमळ, उलटी होणे किंवा पोटात अस्वस्थ वाटणे अशा समस्या जाणवतात. अशा वेळी जवळ एक-दोन लवंगा ठेवून त्या चघळल्या तर मळमळ कमी होण्यास मदत होते. लवंगेमुळे ताजेपणा राहतो आणि पोटातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे प्रवासात लवंग जवळ ठेवणे उपयोगी ठरते. (Keep Cloves in Your Purse, Tiny Spice with Powerful Health Benefits for Digestion, Toothache and Cough remedies )पचनासाठीही लवंग चांगली मानली जाते. काही लोकांना जेवणानंतर पोट फुगणे, गॅस होणे किंवा ब्लोटींगचा त्रास जाणवतो. लवंगेमध्ये पचन सुधारण्याचे गुण असतात, त्यामुळे पोट हलकं वाटण्यास मदत होते. म्हणूनच चहामध्ये किंवा काढ्यात लवंग घालतात. त्यामुळे चहाची चवही वाढते आणि पचनालाही मदत मिळते.
दातांच्या आरोग्यासाठी लवंग फार उपयुक्त मानली जाते. दात दुखत असतील तर लवंग तेलाचा उपयोग अनेक वर्षांपासून केला जातो. लवंगेमध्ये वेदना कमी करण्याचे आणि जंतू नष्ट करण्याचे गुण असतात. त्यामुळे दात दुखत असताना लवंग तेल लावल्याने थोडा आराम मिळू शकतो. तसेच कधी कधी लवंग चघळल्यानेही दातांच्या वेदना कमी होण्यास मदत होते. लवंग चघळल्याने तोंडाचे आरोग्यही चांगले राहते. तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. लवंगेमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तोंडातील जंतू कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते आणि श्वासाला ताजेपणा येतो.
घशासाठीही लवंग फायदेशीर ठरते. सर्दी, खोकला किंवा कफाचा त्रास असेल तर लवंग उपयोगी ठरू शकते. लवंग चघळल्याने घशाला आराम मिळतो आणि कफ कमी होण्यास मदत होते. खोकल्यामुळे लागणारा ठसकाही काही प्रमाणात कमी होऊ शकतो. अशा प्रकारे लहानशी लवंग अनेक आरोग्यदायी गुणांनी भरलेली आहे. रोजच्या आहारात किंवा गरजेनुसार थोड्या प्रमाणात लवंग वापरल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
Web Summary : Cloves offer multiple health benefits, aiding digestion, relieving nausea, and freshening breath. It alleviates toothache and cough. A clove a day keeps ailments away.
Web Summary : लौंग पाचन में मदद करता है, मतली से राहत देता है और सांस को ताज़ा करता है। यह दांत दर्द और खांसी से भी राहत दिलाता है। एक लौंग कई बीमारियों को दूर रखता है।