बऱ्याचदा असं होतं की जेवणात वेगळं काही नसेल नुसती पोळी किंवा भाकरी आणि त्याच्या जोडीला चटणी असेल तरी पोट मस्त भरतं. चटणी आणि गरमागरम पोळीचा बेत म्हणजे काही औरच असतो. त्याची मजाच वेगळी असते. वेगवेगळ्या चवीच्या चटण्या जेव्हा ताटात तोंडी लावायला असतात, तेव्हा ते ताटही कसं परिपूर्ण वाटू लागतं. म्हणूनच वेगवेगळ्या चटण्या हमखास केल्या जातात (how to make kashmiri lal mirchi chutney?). आता त्याच चटणीच्या पंक्तीत ही एक रेसिपी ॲड करा आणि काश्मिरी लाल मिरच्यांची झणझणीत चटणी एकदा करून पाहा..(lal mirchi chutney recipe)
काश्मिरी लाल मिरच्यांची चटणी
ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी १० ते १२ काश्मिरी लाल मिरच्या घ्या. या मिरच्या खूप तिखट नसतात. त्यामुळे त्यांची चटणी आपण तोंडी लावू शकताे. आता या मिरच्या रात्रभर किंवा १० ते १२ तास ताकामध्ये भिजत ठेवा.
लग्नात करतात तसा खमंग, चवदार गाजर हलवा करण्याची रेसिपी- हलवाईने सांगितलेल्या खास टिप्स
ताकात छान भिजलेल्या मिरच्या नंतर पाटा- वरवंटा घेऊन वाटून घ्या किंवा खलबत्त्यात घालून कुटून घ्या किंवा मग तुमच्याकडे हे काहीच नसेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
यानंतर या मिरच्यांमध्ये चवीनुसार मीठ, जिरे आणि लसूणाच्या ८ ते १० पाकळ्या घाला आणि पुन्हा एकदा सगळं एकत्र करून वाटून घ्या.
दिवसभर उभ्याने काम करून रात्री टाचा, गुडघे, पोटऱ्या दुखतात? फक्त १० मिनिटांचा व्यायाम करून पाहा..
यानंतर एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यात आपण केलेली चटणी घाला आणि सगळी चटणी मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे परतून घ्या. यानंतर गॅस बंद करा. चटणी झाली तयार. ही चटणी परतून घेतल्यामुळे ८ ते १० दिवस चांगली टिकते.
