Join us

कार्तिकी एकादशी उपवास : शेंगदाण्याचे लाडू करायचे तर सगळा भुगाच भुगा, पाहा उपवासाचे लाडू करण्याची पारंपरिक पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2025 18:36 IST

Karthiki Ekadashi Special Sheng dana Laddu: कार्तिकी एकदशीसाठी (Karthiki Ekadashi) शेंगदाण्याचे लाडू करायचा विचार असेल तर ही रेसिपी एकदा ट्राय करून पाहाच.. 

ठळक मुद्देतूप आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं की शेंगदाण्याचा लाडू छान एकजीव होतो. मध्येच तुटून त्याचा भुगा होत नाही.

एरवी बरेच जण उपवास करत नाहीत. पण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचा उपवास मात्र अनेकजण करतात. यानिमित्ताने जर तुम्हाला उपवासाला खाण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू करायचे असतील तर पुढे सांगितलेली रेसिपी एकदा ट्राय करून पाहा. कारण अनेकजणांचा असा अनुभव आहे की शेंगदाण्याचे लाडू खूपच ठिसूळ होतात. कधी कधी तर अगदी खातानाही मध्येच फुटतात आणि सगळा कूट इकडे- तिकडे सांडतो. असं होऊ द्यायचं नसेल तर दाण्यांचे लाडू करताना गूळ, तूप आणि शेंगदाण्याचा कूट यांचं प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे. ते कसं ठेवायचं ते पाहा..(Karthiki Ekadashi Special Sheng dana Laddu)

 

शेंगदाण्याचे लाडू करण्याची रेसिपी

२ वाट्या शेंगदाणे

अर्धी ते पाऊण वाटी गूळ

ट्विंकल खन्ना सांगते एक सोपा उपाय, मुलं मोबाइल बाजूला ठेवून पुस्तकं वाचू लागतील रोज

२ टेबलस्पून तूप

१ टीस्पून वेलची पूड

कृती

 

शेंगदाण्याच्या लाडूंना खमंग चव येण्यासाठी शेंगदाणे भाजून घेेणं खूप गरजेचं आहे. मध्यम आचेवर जेवढे खरपूस शेंगदाणे भाजून घ्याल तेवढी छान चव लाडूंना येते. त्यामुळे शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर ते थंड झाले की त्यांची टरफलं काढून टाका.

यानंतर गूळ थोडा किसून घ्या. आता भाजून घेतलेले शेंगदाणे, किसून घेतलेला गूळ, वेलची पूड आणि थोडे गरम केलेले तूप हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्याचा एकत्रितपणे कूट करून घ्या.

बघा केस गळण्याचा नेमका संबंध कशाशी असतो, कारणांकडे दुर्लक्ष कराल तर तब्येतीवर बेतेल....

आता हा कूट एका मोठ्या भांड्यात काढा. त्यातला थोडासा भाग हातात घेऊन दाबून पाहा. दाबल्यानंतर जर तो एकजीव होत असेल तर त्याचे लाडू वळा. आणि जर तसं होत नसेल तर त्यात आणखी थोडं तूप घाला. तूप आणि गुळाचं प्रमाण व्यवस्थित झालं की शेंगदाण्याचा लाडू छान एकजीव होतो. मध्येच तुटून त्याचा भुगा होत नाही. एकदा ट्राय करून पाहा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Karthiki Ekadashi: Traditional peanut ladoo recipe for a perfect, non-crumbly treat.

Web Summary : Making peanut ladoos for Karthiki Ekadashi? Avoid crumbly ladoos by using the perfect ratio of roasted peanuts, jaggery, and ghee. Roast peanuts well, grind with jaggery and cardamom powder, add ghee, and shape into firm ladoos. Enjoy a delicious, melt-in-your-mouth festive treat.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.एकादशीनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४