Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिंच- गूळ घालून केलेल्या कारल्याच्या भाजीची चटपटीत रेसिपी- अजिबात कडू न होणारी चवदार भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2026 12:28 IST

Karela Sabji Recipe: कारल्याची भाजी करण्याची ही एक पारंपरिक रेसिपी पाहा.. आंबट, गोड, तिखट चवीची ही भाजी घरात नक्कीच सगळ्यांना आवडेल..(how to make karela sabji?)

कारल्याची भाजी म्हटलं तरी अनेक जण नाक मुरडतात. लहान मुलांना तर ती भाजी त्यांच्या पानातही नको असते. पण कित्येक मोठी मंडळीही हेच करतात. कारल्याची भाजी अजिबात खात  नाहीत. खरं तर कारल्याच्या भाजीत खूप पौष्टिक घटक असतात. पण केवळ तिच्या कडवटपणामुळे आपण ती टाळतो. म्हणूनच आता ही एक खास रेसिपी पाहा. या रेसिपीनुसार जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर ती अजिबात कडू होत नाही. उलट चिंच आणि गुळामुळे तिची चव जास्त खुलून येते (how to make karela sabji). ही भाजी एवढी चवदार होते की कित्येकदा खाणाऱ्याला ते कडवट कारलं आहे हे देखील लक्षात येत नाही.(Karela Sabji Recipe)

 

चिंच- गूळ घातलेल्या कारल्याच्या भाजीची रेसिपी

कारल्याची भाजी तुम्ही या रेसिपीने करा किंवा आणखी दुसऱ्या रेसिपीने करा... पण सगळ्यात आधी एक गोष्ट मात्र आवर्जून करा आणि ती म्हणजे कारले चिरल्यानंतर त्याच्यातल्या बिया काढून घ्या आणि ते अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत घाला. यामुळे कारल्याचा कडवटपणा खूप कमी होतो.

शुगर आहे, मग जेवण झाल्या झाल्या करा ‘हे’ १ काम, रक्तातील साखर कायम राहील नियंत्रणात

आता यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तेल, मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर कारल्याच्या फोडी कढईत घालून हलक्या परतून घ्या.

 

त्यानंतर कढईवर झाकण ठेवा आणि हलकी वाफ येऊ द्या. कारलं थोडं मऊ झाल्यावर त्यामध्ये चिंचेचा कोळ घाला. २ मध्यम आकारचे कारले असतील तर त्यासाठी ४ टेबलस्पून चिंचेचा कोळ घ्यावा.

फरशी पुसण्याच्या कापडाला कुबट वास येतो? 'या' पद्धतीने धुवा- दुर्गंधी जाऊन कपडा स्वच्छ निघेल

आता चिंचेच्या पाण्यात कारल्याच्या फोडी चांगल्या शिजवून घ्या. यानंतर त्यामध्ये ३ टेबलस्पून किसलेला गूळ, लाल तिखट, मीठ, जिरेपूड आणि थोडा गरम मसाला घाला. सगळे पदार्थ हलवून घ्या आणि कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्या. गरमागरम कारल्याची भाजी तयार. सगळ्यात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 
 

English
हिंदी सारांश
Web Title : Tangy and sweet bitter gourd recipe: A non-bitter, delicious dish.

Web Summary : Many dislike bitter gourd due to its bitterness, despite its nutritional value. This recipe eliminates bitterness using tamarind and jaggery. Soaking bitter gourd in salt water before cooking also helps reduce bitterness. The result is a flavorful, non-bitter dish, often unrecognizable as bitter gourd.
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.